आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमक:अनंतनागमध्ये तोयबाचा हायब्रिड अतिरेकी ठार

श्रीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक हायब्रिड अतिरेकी मारला गेला. पोलिसांनी सांगितले की, कुलगामच्या शिरपोराचा हायब्रिड अतिरेकी सज्जाद अहमद तांतेर ऊर्फ फुकरान १२ नोव्हेंबरला अनंतनागच्या बिज बोहरातील रेमोफेनमध्ये झालेल्या एका स्थलांतरित मजुराच्या हत्येत सहभागी होता. चौकशीत त्याने हत्येत सहभागी झाल्याची कबुली दिली हाेती. पोलिसांनी हत्येत वापरलेले एक पिस्तूल जप्त केले. तांत्रेने बिज बेहराच्या डू डू भागात अतिरेकी असल्याची माहिती दिली हाेती. यानंतरची नाकेबंदी व चकमकीत तांतेर मारला गेला.

बातम्या आणखी आहेत...