आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल फोनचे लोकेशन ऑफ असूनही उपग्रहाद्वारे ट्रॅकिंग ऑन:जगातील प्रत्येक फोनचा पर्सनल डेटा स्टोअर असून त्याची विक्री होते

न्यूयॉर्क18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल फोनचे लोकेशन ऑफ केल्यानंतर तुमचा पर्सनल डेटा सुरक्षित असेल असे तुम्हाला वाटत असल्यास ते चुकीचे आहे. लोकेशन ऑफ केल्यामुळे केवळ मोबाइल अॅप्सचे लोकेशन बंद होते. मोबाइल फोनला टॉवर किंवा वायरलेस नेटवर्कद्वारे ट्रॅक केले जाऊ शकते. त्याला सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि यातून मिळणाऱ्या डेटाला सॅटेलाइट डेटा म्हटले जाते. जगभरातील अनेक सरकार, कंपन्या अशा सॅटेलाइन डेटाद्वारे लोकांची खर्चाची पद्धती, आरोग्य, आर्थिक स्थिती, लोकेशनला ट्रॅक करतात. काही वर्षांपूर्वी जर्मनीचे नेते माल्ट स्पित्झ यांनी एका मोबाइल कंपनीवर सॅटेलाइट डेटा ट्रॅकिंगचा खटला दाखल केला होता. ते म्हणाले, लोकेशन ऑफ असूनही त्यांची खासगी माहिती लीक होत आहे. तपासात सहा महिन्यांच्या काळात त्यांच्या लोकेशनबाबतची ३५ हजार प्रकारची माहिती मोबाइल कंपनीकडे होती, असे दिसून आले.

प्रत्येक मोबाइल नेटवर्क लोकल टॉवर आणि उपग्रहाची जोडलेला असतो. मोबाइलमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमद्वारे (जीएनएसएस) लोकेशन ट्रॅक होते. नंतर त्याचा डेटा प्रोसेस होऊन नॅशनल मेरीटाइम इलेक्ट्रॉनिक असोसिएशनकडे (एनएमईए) जातो. एनएमईएचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. परंतु जगातील कोणत्याही मोबाइलचा डेटा काढायचा झाल्यास येथून काढता येतो. एनएमईए जगभरात विशिष्ट शुल्क आकारून मोबाइल डेटाची विक्री करते. त्याची खरेदी मुख्यत्वे कंपन्या आणि सरकार करतात. २०१६ मध्ये गुगलने उद्योगांना जीएनएसएस डेटाचे आेपन अॅक्सेस दिले होते. जगभरातील सुमारे सर्व जीपीएस डिव्हाइस गुगल मॅप्सवर आधारित आहेत. लोकेशन शेअरिंगच्या वादानंतर गुगलने अॅक्सेसला मर्यादित केले. त्यानंतरही जीएनएसएसएसच्या डेटा वापरावरून वादंग झाले. कारण मोबाइलच्या जीएनएसएस चिप सेटद्वारे मोबाइल लोकेशन बाहेर पडते. जगभर मोबाइल युजरला मात्र त्याबद्दल काहीही माहिती नाही. युजरचा डेटा साठवला जातो. सॅटेलाइट ट्रॅकिंगद्वारे डेटा ग्लोबल झाला आहे. युरोपात स्ट्राइल-३ मोबाइल सर्व्हिलन्स नेटवर्कद्वारे जगभरातील ट्रॅकिंगची योजना होती. परंतु वादानंतर युरोपीय संघाने ते पाऊल मागे घेतले.

एक्स्पर्ट
वापरानंतर ब्लूटूथ आणि जीपीएस ऑफ करावे
{मोबाइलमध्ये लोकेशनचे ऑप्शन एक अॅप आहे. कॅब बुकिंग वगैरेमध्ये ते गरजेचे असते. काम झाल्यावर ते ऑफ करावे.
{ब्लूटूथ व जीपीएसच्या ऑप्शनला चेक करत राहावे. ते अकारण सुरू ठेवू नये. कारण डेटा हॅक होऊ शकतो.
{लोकेशन, जीपीएस, ब्लूटूथ बंद ठेवल्यामुळे तुम्ही थर्ड पार्टी अॅप उदाहरणार्थ फेसबुक, व्हॉट्सअॅपवर डेटा लीकपासून बचाव शक्य.
{पर्सनल इन्फर्मेशन शेअर करू नका. डिलिट झाल्यानंतरही ती रिप्लिकेट होते.
- अभिषेक धाभाई, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट

बातम्या आणखी आहेत...