आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tradition | 450 Years Wrestling In Tulsidas Arena In Varanasi, Girls Are Also Trending

परंपरा:बनारसच्या मातीत पिढ्या शिकताहेत डावपेच; तुलसीदासांच्या आखाड्यात 450 वर्षांपासून कुस्ती, मुलीही पारंगत

धर्मेंद्रसिंह भदौरिया | वाराणसी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुलसीदास आखाड्यात कुस्तीचा सराव करताना पहिलवान.
  • येथील पहिलवान लष्कर व शासकीय विभागातही नोकरी मिळवताहेत

सकाळी सहा वाजताच तुलसी घाटाच्या मागे आखाडा गोस्वामी तुलसीदासमध्ये पहिलवान येणे सुरू होते. हा सामान्य आखाडा नाही. त्याची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांनी केली होती. मागील सुमारे ४५० वर्षांपासून सतत येथे पहिलवान सराव करत आहेत. काही तर पिढ्यांपासून. त्याला आखाडा स्वामिनाथ नावानेही ओळखले जाते. सध्या येथे शंभरपेक्षा जास्त पहिलवान येतात. एकेकाळी हिंद केसरी, उत्तर प्रदेश केसरीसारखे पहिलवान देणाऱ्या या आखाड्यातून आज दरवर्षी दोन ते चार पहिलवान क्रीडा कोट्यातून लष्कर आणि सरकारी विभागात नोकरी मिळवतात. गेल्या चार वर्षांपासून मुलीही कुस्ती शिकायला येत आहेत. आखाड्याचे महंत आणि बीएचयू आयआयटीचे प्रा. विश्वंभरनाथ मिश्रा सांगतात, हा तुलसीदास आखाडा ऐंशी घाटाचाच एक भाग आहे. तुलसीदासजींनी येथे राहूनच किष्किंधा कांड आणि त्याच्यानंतरचे रामचरित मानस लिहिले होते. मिश्रा सांगतात, स्थापनेचा खरा काळ तर माहीत नाही, मात्र या आखाड्याला सुमारे ४५० वर्षे झाली असतील. मी स्वत: आपल्या १४ व्या पिढीतील आहे, जो येथे पहिलवानकी करत आहे.

आखाड्यातून मेवा पहिलवान, हिंद केसरी कल्लू पहिलवान आणि उत्तर प्रदेश केसरी श्यामलाल पहिलवान झाले आहेत. आताही शंभरपेक्षा जास्त पहिलवान रोज येथे कुस्ती शिकायला येतात. सन २०१६ पासून मुलींनाही आखाड्यात आणले गेले. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये वार्षिक स्पर्धा होते. यात पूर्ण राज्यातील पहिलवान सहभागी होतात. पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा संस्थेतून कुस्तीत डिप्लोमा करणारे विजयकुमार यादव आखाड्याचे प्रशिक्षक आहेत. विजय सांगतात की, येथील मुली राष्ट्रीय पातळीवर नाव कमावताहेत. खुशी, पूजा, गुनगुन शालेय गटात राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळताहेत, तर प्रशांत यादव अखिल भारतीय विद्यापीठ पातळीवर खेळले आहेत. अशोक पाल सीआरपीएफमध्ये, रामप्रवेश, चंदन यादव आणि गुलाब यादव लष्कर-बीएसएफमध्ये क्रीडा कोट्यातून नोकरी करत आहेत.