आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिमाचल प्रदेश:अटल बोगदा खुला वाहतूक ठप्प, लांबच लांब रांग; स्थानिक लोकांना पर्यटनामुळे त्रास

मनाली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पर्यटकांनी लाहोल खोऱ्यात न येण्याचे प्रशासनाचे आवाहन

हिमाचल प्रदेशात मुसळधार बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा बंद करण्यात आला होता. परंतु बुधवारी बर्फवृष्टीत खंड पडल्याने हा बोगदा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला. त्याची माहिती मिळताच तो पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. काही वेळातच १२०० हून जास्त पर्यटकांची वाहने रोहतांग मार्गावर आली. त्यामुळे या भागात लांबच लांब रांग लागली होती. वाहतूक ठप्प झाली होती. बोगद्यातून बाहेर पडताच लाहुलची चंद्रा खोरे सुरू होते. येथे चंद्रा नदीवर पूल बनलेला आहे. बुधवारी येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. त्याशिवाय काही पर्यटकांनी वाहने मुद्दाम उभी केली होती. प्रशासनाने सध्या हा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर केला आहे. पर्यटकांनी आता या भागातून सकाळी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्थानिक लोकांना पर्यटनामुळे त्रास

खोऱ्यातील पंचायतांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊन लागू केला आहे. ढाबे व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु असे असले तरी पर्यटकांचा आेघ खूप वाढत चालला आहे. त्यामुळे लाहोल खोऱ्यातील लोक त्रस्त आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पर्यटकांनी लाहोल खोऱ्यात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले.

बातम्या आणखी आहेत...