आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलनाच्या ८५ व्या दिवशी गुरुवारी शेतकऱ्यांनी देशभरात रेल रोको केला. पाटणा ते दिल्ली, अंबालापर्यंत त्याचा परिणाम जाणवला. आंदोलनामुळे उत्तर रेल्वेला २५ गाड्यांच्या वेळेत बदल करावा लागला.
सुमारे ४० संघटनांच्या ‘संयुक्त किसान मोर्चा’च्या आवाहनावरून शेतकऱ्यांनी दुपारी १ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत देशात विविध भागात रेल्वे रोखल्या. सर्वाधिक परिणाम पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशात जाणवला. पंजाबमध्ये ४० पेक्षा जास्त ठिकाणी रेल्वेमार्ग रोखले. शेतकऱ्यांनी रुळावर निदर्शने केली. हरियाणात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रुळावरच बैठक घेतली. महाराष्ट्र, बिहार व कर्नाटकातही अनेक स्थानकांवर रेल्वेगाड्या रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. पाटण्यातही रेल्वे रोखण्यात आल्या. दिल्लीत टिकरी सीमेसह चार मेट्राे स्थानके बंद करण्यात आली. रेल राेको आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम दिल्ली- मुंबई, दिल्ली- जम्मू, दिल्ली- भोपाळ आणि दिल्ली- हावडा मार्गावर झाला.
शेतकरी पीक कापणी करणार नाही, जाळून टाकतील : टिकैत
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, ‘शेतकरी पीक कापणीसाठी गावी परततील, या भ्रमात सरकारने राहू नये. सरकारने हट्ट केला तर आम्ही उभी पिके जाळून टाकू. आंदोलन २ महिन्यांत संपून जाईल, असा िवचार त्यांनी करू नये. आम्ही पिकांसोबतच आंदोलन करू.’ ते पुढे म्हणाले, ‘पिकांचे दर वाढवले जात नाही आहेत. मात्र इंधनाची दरवाढ होत आहे. केंद्राने स्थिती खराब केली तर आम्ही ट्रॅक्टर घेऊन बंगाललाही जाऊ.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.