आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूच्या मदुराई शहरात शुक्रवारी एक ह्रदयद्रावक घटना घडली. त्यात एक मजूर साफसफाई करताना एका खड्ड्यात अडकला. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याचे शीरच धडावेगळे झाले.
इरोड जिल्ह्यातील सतीश उर्फ वीरनन शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास विलंगुडीतील एका 11 फूट खोल खड्ड्यात साफसफाई करत होता. त्यावेळी अचानक मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर पडला. त्यात तो दबला गेला. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी फायर फायटर्स किंवा मदत पथकाला पाचारण न करता JCB ने खोदकाम केले. त्यात सतीशचा जागीच मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांकडून 10 लाखांची मदत
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पीडित कुटुंबियांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तर पोलिसांनी साइट इंजिनिअर सिकंदर, पर्यवेक्षक बालू व जेसीबी ऑपरेटर सुरेश यांना अटक केली आहे. या सर्वांवर मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खड्डा 2 फुटांपेक्षा कमी रुंद होता
घटनेचे वृत्त मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. अधिकाऱ्यांच्या मते, हा खड्डा 2 फुटांहून कमी रुंद होता. त्यात एकावेळी एक व्यक्तीच जावू शकत होता.
या अपघाताविषयी कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सामान्यतः मजुराच्या सुरक्षेसाठी त्यांना दोरी बांधून खड्ड्यात सोडले जाते. पण, या प्रकरणात असे काही झाल्याचे दिसून येत नाही. दरम्यान, मजुराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.