आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trailer Hit A Storm Jeep Of MP Devotees Going To Ramdevra; 8 Killed And 7 Injured; News And Live Updates

राजस्थानमध्ये भीषण अपघात:दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या मध्यप्रदेशातील 11 लोकांचा मृत्यू, 12 सीटर गाडीमध्ये 18 लोक करत होते प्रवास

नागौर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाडी होती ओव्हरलोड

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील श्री बालजीजवळ भीषण अपघात झाल्याची घडना घडली आहे. या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर गाडी आणि ट्रेलरमध्ये धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला आहे.

अपघातातील सर्व मृतक मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन जिल्ह्यातील घाटिया पोलीस ठाण्याच्या सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते आहे. अपघातानंतर महामार्ग बऱ्याच वेळेपर्यंत ठप्प होता. मृतांमध्ये 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

गाडी होती ओव्हरलोड
अपघातादरम्यान, 12 सीटर गाडीमध्ये 18 लोक प्रवास करत असल्याने ती गाडी ओव्हरलोड झाली होती. हे सर्व लोक रामदेवराला भेट दिल्यानंतर करणी मातेचे दर्शन घेत घरी परतत होते. दरम्यान, नागौरहून नोखाकडे जाणाऱ्या ट्रेलरने या गाडीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

8 जणांचा जागीच मृत्यू, 3 जणांचा वाटेतच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेलरने जीपला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जणांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, अनेक लोक अपघातग्रस्त गाडीमध्ये अडकले होते. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक लोकांच्या मदतीने गाडीतील मृतकांना बाहेर काढण्यात आले .

बातम्या आणखी आहेत...