आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pujari Training Update | Leran Pujari Hindi And English Mantra | Train The Priests Through The Skill Development Scheme Of The Centre

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:केंद्राच्या कौशल्य विकास योजनेतून देणार पुजाऱ्यांना प्रशिक्षण; मंत्रांचा हिंदी, इंग्रजी अनुवादही शिकवणार

नवी दिल्ली / सुजित ठाकूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने पुजारी तसेच कर्मकांडाशी निगडित लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वरोजगाराशी जोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुढील १८ महिन्यांत देशभर १.७२ लाख पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांनाही प्रथमच केंद्राच्या सरकारी प्रशिक्षण योजनेशी जोडण्यात येणार आहे. या संस्था प्रशिक्षणाशी निगडित गरजा पूर्ण करतील. त्यासाठी केंद्र सरकार त्यांना मोबदला देणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमावर किती खर्च होईल याबाबत सध्यातरी कोणताही अधिकारी बोलण्याच्या स्थितीत नाही.

पुजाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी देशभर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. कौशल्य विकास मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे असे की, मध्ये प्रदेशात २२००, गुजरातेत ६३२, छत्तीसगडमध्ये २०९ आणि बिहारमध्ये १४०० लोकांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक म्हणजे ५६ हजार नोंदण्या तामिळनाडूत करण्यात आल्या आहेत. दक्षिण भारतात पुजाऱ्यांसाठीच्या या प्रशिक्षणाचा कार्यकाळ ६ महिने इतका ठरवण्यात आला आहे, तर इतर ठिकाणी ३ ते ६ महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

त्याचे कारण हे की, पूजापाठ, कर्मकांड आदींमध्ये वाचले जाणारे श्लोक आणि मंत्रांचा इंग्रजी व हिंदी अनुवादही शिकवला जाईल. हिंदी भाषिक क्षेत्रात हिंदी अनुवाद शिकणारी गरज नसेल. त्यामुळे अशा क्षेत्रातील कोर्स ३ महिन्यांचाच असेल. दुसरीकडे तामिळनाडू, तेलंगणासह दक्षिणेतील इतर राज्यांत हिंदी अनुवाद शिकण्यासाठी ३ महिन्यांचा अधिक वेळ देण्यात आला आहे.प्रशिक्षण विषयात ऑनलाइन पूजेचा समावेश आहे. त्यासाठी आठवड्याचा कोर्स असेल. मंत्रालयाचे म्हणणे असे की, येत्या काळात ऑनलाइन पूजेची मागणी वाढणार आहे. त्यासाठी पुजाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

प्रशिक्षण पू्र्ण झाल्यानंतर संकेतस्थळाशी जोडणार

पुजाऱ्यांना प्रशिक्षणानंतर एक प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याची पूर्ण माहिती एक संकेतस्थळावर नोंद केली जाणार आहे. प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पुजाऱ्यांची विभागणी (मंत्रपठण करवणारे, कर्मकांड करणारे, पूजा करवणारे) करून क्लस्टर बनवण्यात सरकारची मदत करतील. त्यामुळे लोकांना त्यांची सेवा घेण्यात सुलभता येईल. त्यामुळे पुजाऱ्यांची उणीव तर भासणार नाहीच, शिवाय त्यांना कामही मिळेल.

पद्धतीनुसार निश्चित करणार प्रशिक्षण वर्ग

  • गृहपूजा, लग्न, मुंडण, श्राद्धासारख्या विधीसाठी मंत्र, पूजा पद्धती आणि क्रम.
  • पितृपक्षात तर्पणासारखे कर्मकांड
  • गरुड पुराण आणि सत्यनारायण कथेचे विधिवत पूजन करणार.
  • ज्योतिष गणना आणि ग्रह-नक्षत्रांबाबत संपूर्ण माहिती.
  • राज्य आणि क्षेत्राच्या हिशेबाने संस्कारांचे प्रशिक्षण.
बातम्या आणखी आहेत...