आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Train Timing News: Indian Railway Train Time Punctuality Performance Percentage Rate News Updates

कोरोना काळात रेल्वेचा रेकॉर्ड:पहिल्यांदाच 100% ट्रेन्स वेळेवर पोहचल्या; हा रेकॉर्ड एका आठवड्यापूर्वी बनला असता, पण एक ट्रेन लेट झाल्यामुळे परफॉर्मेंस 99.54% राहिला

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व ट्रेन्स वेळेवर पोहचल्या आहेत. हा रेकॉर्ड 1 जुलै 2020 ला बनला, जेव्हा ट्रेन्सची पंक्चुअॅलिटी 100% होती. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी याची माहिती दिली.

मंत्रालयाने ट्वीट केले, "भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व ट्रेन्सने 100% पंक्चुअॅलिटी मिळवली. सर्व ट्रेन्स वेळेवस सुरू पोहचल्या. यापूर्वी 23 जूनला 99.54% पंक्चुअॅलिटी मिळवली होती. या तारखेला एक ट्रेन उशीराने पोहचली."

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावर आनंद व्यक्त करत ट्वीट केले की,, "ट्रेन्स फास्ट लेनमध्ये चालत आहेत. सेवेमध्ये सुधारणा आली आहे. कोरोना संकटामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये रेल्वेने लोकांना घरापर्यंत पोहचवण्यात मदत केली." 

12 ऑअगस्टपर्यंत रेगुलर ट्रेन्स चालणार नाहीत

कोरोना व्हायरसमुळे रेगुलर ट्रेन सर्विस 12 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. परंतू, 230 मेल आणि स्पेशल एक्सप्रेस ट्रेन्स सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...