आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Bhagalpur Train Viral Video; Mobile Phone Snatcher Beaten, Latest News And Update

प्रवाशांनी धावत्या रेल्वेत चोराला लटकवले:खिडकीतून मोबाइल चोरण्याचा केला होता प्रयत्न; प्रवाशांनी केली बेदम मारहाण

पाटणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या भागलपूरमध्ये बुधवारी रेल्वे प्रवाशांनी मोबाइल चोराला तब्बल 80 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेबाहेर लटकवल्याची घटना उजेडात आली आहे. हा तरुण रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करत होता. पण सावध प्रवाशाने त्याचा हात पकडला. त्यानंतर त्याला त्याच स्थितीत रेल्वेबाहेर लोंबकळवत ठेवले.

भागलपूरच्या ममलखा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. रेल्वे फलाटावर उभी होती तेव्हा एका तरूणाने खिडकीतून मोबाइल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण प्रवाशांनी तत्काळ त्याचा हात पकडला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्याला जवळपास 10 किमीपर्यंत तसेच रेल्वेबाहेर लोंबकळत ठेवले. यावेळी रेल्वेचा वेग ताशी 80 ते 100 किमीच्या आसपास होता.

प्रवाशी खिडकीतून हात बाहेर काढून त्याचा व्हिडिओ बनवत होते. तरुणाचे पाय अनेकदा रुळांवरील गिट्टीवर आदळले. पण प्रवाशांचे हृदय द्रवले नाही. काहींनी तर त्याला ठार मारण्याचे सूतोवाच केले. पण सुदैवाने तो वाचला.

प्रवाशांनी चोराला धावत्या ट्रेनच्या गेटला लोंबकळत ठेवले.
प्रवाशांनी चोराला धावत्या ट्रेनच्या गेटला लोंबकळत ठेवले.
चोर प्राणांची भीक मागत होता, लोक व्हिडिओ बनवत होते.
चोर प्राणांची भीक मागत होता, लोक व्हिडिओ बनवत होते.

विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वीच बेगुसरायमध्येही अशीच एक घटना घडली होती. तेव्हाही प्रवाशांनी चोराला 15 किमीर्यंत रेल्वेबाहेर लोंबकळत ठेवले होते. हा चोरही रेल्वे फलाटावरून हलल्यानंतर मोबाइल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रवाशाने हात पकडल्यामुळे तो त्याच स्थितीत जवळपास 15 किमीपर्यंत तसाच लोंबकळत राहिला.

बातम्या आणखी आहेत...