आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Train : War Against Corona; 5,071 Isolation Bins Prepared, 81 Thousand Patients Will Be Treated

रेल्वे विभागही सज्ज:युद्ध कोरोनाविरुद्ध; 5,071 विलगीकरण डबे तयार, 81 हजार रुग्णांवर उपचार होतील

रतलाम ( शिवेंद्र दुबे )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 विभागांत पुन्हा तयार झाले विलगीकरण डबे
  • चाकांवर उपचार : मे 2020 मध्ये बनले डबे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने वाढत असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गरज भासल्यास रेल्वेचे ५,०७१ विलगीकरण डबे सज्ज अाहेत. यात रतलाम विभागातील ७० यासह पश्चिम रेल्वे विभागाचे ४६०डबे अाहेत. उर्वरित १५ विभागांमध्ये ४,६११ डबे अाहेत. प्रत्येक डब्यात १६ बेड अाहेत. गरज भासल्यास देशातील विविध स्थानकांवर उभ्या असलेल्या या विलगीकरण डब्यांमध्ये जवळपास ८१,१३६ पाॅझिटिव्ह वा संशयित रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. एका शहरातून दुसऱ्या शहरात नेले जाऊ शकते. यामध्ये रेल्वे अाणि अाराेग्य विभाग संयुक्तपणे वैद्यकीय कर्मचारी तैनात करतील. परंतु, अातापर्यंत हे डबे वापरण्याची वेळ अालेली नसली तरी काेराेना संसर्गाची दुसरी लाट लक्षात घेता रेल्वेने वर्षभरापूर्वी तयार केलेल्या या डब्यांची देखभाल दुरुस्ती करून ते वापरण्यासाठी सज्ज ठेवण्यात अाले अाहेत. प्रत्येक डबा तयार करण्यासाठी सुमारे २ लाख रुपये खर्च आला आहे.

प्रवासी डब्यात रूपांतर
उपयाेग हाेऊ न शकल्याने या डब्यांचे पुन्हा प्रवासी डब्यात रूपांतर करण्यासाठी रेल्वे बाेर्डाने जानेवारीत सांगितले हाेते. त्यानंतर २५० डबे पुन्हा प्रवासी डब्यात रूपांतरित झाले. राज्य सरकारची परावानगी नसली तरीही हे विलगीकरण डबे सज्ज अाहेत.

रतलाममध्ये या ठिकाणी
बडलई20
उज्जैन 20
गौतमपुरा 18
मांगलियामध्ये20
(७० डबे महू व दाहोद कार्यशाळेत तयार झाले, ८ मुंबईहून अाले)

स्लीपर काेचमध्ये असे बनवले अायसाेलेशन बेड
5. एका डब्यात ४ शौचालये असतात. दाेन बाथरूम व २ शाैचालयात रुपांतरित.
6. प्रत्येक केबिनच्या मधाेमध प्लास्टिकचे पडदे.
2. वैद्यकीय उपकरणे चालवण्यासाठी माेबाइल चार्जर प्लगच्या जागी पाॅवर प्लग साॅकेट.
3. रुग्णांना लावण्यासाठी बाॅटल स्टँड
4. खिडक्यांवर बाहेरून मच्छरदाणी लावली अाहे.
1. डब्यात अाॅक्सिजन सिलिंडर स्टँड तयार अाहे.
2. वैद्यकीय उपकरणे चालवण्यासाठी माेबाइल चार्जर प्लगच्या जागी पाॅवर प्लग साॅकेट.

बातम्या आणखी आहेत...