आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील रीवा येथे गुरुवारी रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाची प्रकृती चिंताजनक आहे. विमान मंदिराच्या कळसाला धडकले. प्राथमिक तपासात अपघाताचे कारण धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रीवा जिल्ह्यातील चोरहाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी गावातील आहे. उमरी विमानतळावर फाल्कन कंपनी प्रशिक्षण देते.
लोक घाबरून बाहेर आले
रीवा हवाईपट्टी विमानतळ म्हणून विकसित केली जात आहे. येथे फाल्कन एव्हिएशन ट्रेनिंग अकादमी प्रशिक्षणार्थींना पायलट प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देते. रात्री 11.30 वाजता पायलट कॅप्टन विमल कुमार (54) हे बिहारमधील पाटणा येथील सोनू यादव (22) या विद्यार्थ्याला प्रशिक्षण देत होते. या दरम्यान त्यांचे विमान मंदिराला धडकले. यादरम्यान मोठा स्फोट झाला. विमानाचे अवशेष सर्वत्र पसरले होते. या भागातील घरांमध्ये झोपलेले लोक घाबरून बाहेर आले. कॅप्टन विमल राजस्थानचे रहिवासी होते.
जखमींवर रीवा येथे उपचार
रीवाचे एसपी नवनीत भसीन यांनी सांगितले की, फाल्कन एव्हिएशन अॅकॅडमीचे विमान चोरहाटा पोलिस स्टेशन अंतर्गत रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान क्रॅश झाले. या विमानात दोन जण होते, त्यात प्रशिक्षण देणाऱ्या पायलटचा मृत्यू झाला आहे. आणखी एक जण जखमी झाला असून त्याला रीवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवण्यात आला असून अपघाताचे कारण शोधता यावे यासाठी अधिक तपास केला जात आहे.
क्रॅश विमानाचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.