आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे गाव:लोकांनी कचरा करू नये म्हणून प्रत्येक घरासमोर नावाच्या पाटीसह कचरापेटी

कैथल21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब सीमेला लागून असलेले कैथल जिल्ह्यातील रत्ताखेडा (कढाम) गाव अनेक बाबतीत शहरापेक्षाही पुढे आहे. ६ वर्षांपर्यंत सुमारे एक हजार लोकसंख्येचे हे गावही सामान्य गावांसारखे होते. ग्रामपंचायत व ग्रमस्थांनी मिळून केलेल्या कामांमुळे आता या गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेरितही करत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामस्थ जागरूक आहेत. प्रत्येक घरासमोर नावाच्या पाटीसह कचरापेटीही ठेवणारे हे हरियाणातील पहिले गाव आहे. प्रत्येक घरासमोर व आत झाड लावण्याची पद्धतच बनली, जेणेकरून पर्यावरण स्वच्छ राहील. मागील पाच दशकांपासून गावातील कोणत्याही व्यक्तीविरोधात पोलिसांत एकही गुन्हा दाखल नाही.

यावरून येथील बंधुभाव दिसून येतो. पंजाब सीमेला लागून असतानाही ग्रामस्थ नशा करत नाहीत आणि कुणीही या व्यवसायात नाही. ग्रामस्थ गावाची स्वच्छता करतात आणि परिसरात लावलेल्या झाडांची स्वत:च देखभाल करतात. भावी पिढीने ही परंपरा कायम ठेवावी यासाठी देशभक्ती व स्वच्छतेचे प्रेरणादायी म्यूरल बनवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...