आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास 50 टक्के महाग:विमान भाडे 40 टक्के अन् हॉटेल खर्च 30 टक्के वाढला; तरीही ख्रिसमस, नववर्षाच्या बुकिंगमध्ये वाढ

नवी दिल्ली / अजय तिवारी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पर्यटनाची हौस असलेल्यांवर महागाईचा कोणताच परिणाम होताना दिसत नाही. २०२१ च्या तुलनेत विमान भाडे ३०-४०%, हॉटेल खर्च २०-३०% आणि इतर सर्व खर्च मिळून प्रवास करणे आता ५०% महागले आहे. तरीही यंदा ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त गोवा, मनाली, लडाख, मालदीव, मॉरिशस आदी प्रमुख पर्यटन स्थळांसाठी बुकिंग गेल्या वर्षाच्या तुलनेत ४५-५५% जास्त झाली आहे.

कन्फर्मटिकिटचे सहसंस्थापक आणि सीओओ श्रीपाद वैद्य सांगतात, हिवाळी सुट्यांसाठी गोवा व पुद्दुचेरीची तिकीट बुकिंग ५०% वाढली आहे. मुंबई-कोलकाता व दिल्लीसाठीच्या बुकिंगमध्ये १५%-२०% वाढ झाली आहे. रेल्वे प्रवास २३% अधिक खर्चिक झाला आहे. टूर पॅकेज २०१९ च्या तुलनेत १५-२०% महाग आहेत. तरीही देशांतर्गत उड्डाणे ९०-९५% फुल्ल आहेत. बजेट हॉटेल्सची बुकिंग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान ४४% वाढली. मेकमायट्रिपचे सीओओ विपुल प्रकाश यांच्या मते, ख्रिसमस व नववर्षानंतरही बुकिंगमध्ये घट होण्याची शक्यता कमी आहे.

सध्या इथे जाताहेत भारतीय...

फॅमिली टूरसाठी : केरळ, उत्तराखंड, हिमाचल, ओडिशा, राजस्थान, दुबई, बाली, सिंगापूर, भूतान, श्रीलंका, नेपाळ.

मित्रांसोबत : गोवा, पुद्दुचेरी, मनाली, काश्मीर, अंदमान, थायलंड व मॉरिशस.

हनीमून : गोवा, मनाली, लडाख, मालदीव, मॉरिशस आणि व्हिएतनाम.

डेस्टिनेशन वेडिंग : गोवा, राजस्थान, केरळ, हिमाचल, गुजरात, बाली आणि थायलंड.

...पुढे इथे जाण्याची तयारी

पॉलिसी बाजारचे ट्रॅव्हल इन्शुरन्स हेड मानस कपूर म्हणाले, डिसेंबर-जानेवारीच्या सुट्यांत बहुतांश लोक दुबई, थायलंड आदी देशात जातात. सध्या यूरोप आणि अमेरिकेत प्रवास कमी आहे. कारण तिथे सध्या जास्त थंडी आहे व फिरण्याची अनेक ठिकाणे बंद आहेत. मात्र, फेब्रुवारीनंतर इंग्लंड, नॉर्वे, स्वित्झर्लंडसह युरोपातील देश आणि अमेरिकेसाठी प्रवास वाढू शकतो.

बातम्या आणखी आहेत...