आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ देशातील आँखो देखा हाल:नशेच्या विळख्यातील माेठ्या घरातील मुलींवर उपचार, आधी शाळा-काॅलेज सुटले, अनेकींचे लग्नही मोडले!

पंजाबएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 महिन्यांत 1.20 लाख रुग्णांवर उपचार

 पंजाबमध्ये नशामुक्ती साठी १९८ उपचार केंद्रे आहेत. सरकारी रुग्णालयात ३५ ड्रग डी-अॅडिक्शन सेंटरमध्ये रुग्णांना भरती केले जाते. लाॅकडाऊनमध्ये सुमारे १.२० लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे. ४.१४ लाख लाेकांवर उपचार सुरू असून ही संख्या ५.३५ लाखावर गेली आहे.

लुधियानात सर्वाधिक पीडित, ५० हजारांवर रुग्णांची केंद्राकडे धाव
सरकारी रुग्णालय. लुधियानाच्या ड्रग्ज डी-अॅडिक्शन सेंटरमध्ये सीता आपल्या मुलासह डाॅक्टरांची प्रतीक्षा करत हाेत्या. त्या पहिल्यांदाच नशामुक्ती केंद्रात आल्या हाेत्या. त्यांना विचारणा केली तेव्हा त्या म्हणाल्या, माझे पती दाेन वर्षांपासून नशेच्या आहारी गेले आहेत. त्यांना घेऊन आले आहे. ते मंडईत ठेकेदार आहेत. लाॅकडाऊनच्या काळात कामासह नशाही बंद झाली. त्यामुळे येथे आणावे लागले. तीन मुलांचा पिता आता नशा साेडून ५ जणांचे कुुटंुब चालवू इच्छिताे. असेच इतरही पीडित हाेते. सेंटरचे प्रभारी डाॅ. विवेक म्हणाले, आताआेपीडींची संख्या दुप्पट झाली.तीन महिन्यांत पन्नास हजारांहून जास्त पीडित या केंद्रात आले.

पंजाबमध्ये नशेची साखळी खंडित, लॉकडाऊनच्या ३ महिन्यांत १ लाख लाेकांनी नशामुक्तीसाठी केली नाेंदणी

नशापान करण्याच्या व्यसनाने पंजाबमधील तरुणांनाच नव्हे, तर शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुलींनाही कसा विळखा घातला हाेता हे गेल्या तीन महिन्यांत लाॅकडाऊनमधून दिसून आले आहे. कडक संचारबंदीमुळे नशेच्या पुरवठ्याची साखळी खंडित झाली. सामान्य ते उच्चभ्रू घरांतील मुली ड्रग डी-अॅडिक्शन सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत. व्यसनी बनलेल्या १ लाखाहून जास्त लाेकांनी या तीन महिन्यांत नाेंदणी केली आहे. कपुरथळा येथील नशामुक्ती केंद्राला आम्ही भेट दिली. नशापान करण्याच्या सवयीमुळे अनेक मुली वाममार्गाला लागल्या. त्यापैकीच शालिनी व प्रभज्याेत (नावे बदलली) आहेत. दाेघीही महाविद्यालयात शिक्षण घेत हाेत्या, परंतु ध्रूमपान करणे सवयीचे झाले हाेते. त्यामुळे घराच्यांनी शिक्षण बंद करून टाकले. लग्नाचीही चिन्हे दिसेनात. आधी बारगर्ल, नंतर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या. केंद्राचे अधिकारी डाॅ. संजीव भाेले म्हणाले, सेंटरमध्ये १५९ महिलांची नाेंदणी झाली. त्यापैकी ९५ टक्के मुली १८ ते २५ वर्षांच्या आहेत. या केंद्रात नशापीडित मुलींना दरराेज सकाळी याेग, ध्यान करायला लावतात. त्यातून त्यांचे मनाेबल वाढवण्याचा होताे.

बातम्या आणखी आहेत...