आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tree | Plant | Marathi News | Only One Person Planted 10 Lakh Fruit Trees, The Amount Went Up To Rs 400 Crore When Compensation Was Fixed For The Construction Of The Railway!

दिव्य मराठी विशेष:फक्त एका व्यक्तीने तब्बल 10 लाख फळझाडे लावली, रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी भरपाई निश्चित झाली तेव्हा रक्कम 400 कोटींवर गेली!

मनमीत | डेहराडून6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तराखंडमध्ये निवृत्त अधिकाऱ्याच्या मेहनतीमुळे रेल्वेला फुटला घाम, आता प्रकरण लवादाकडे

उत्तराखंडमध्ये एका निवृत्त जिल्हा कृषी अधिकाऱ्याने रेल्वेला चांगलाच घाम फोडला आहे. या निवृत्त अधिकाऱ्याने रिकाम्या जमिनीवर एवढी फळझाडे लावली आहेत की नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी ही झाडे तोडायची असतील तर ४०० कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागेल. वैयक्तिक स्तरावर ही देशातील भरपाईची बहुधा सर्वाधिक रक्कम असेल. त्यामुळे हे प्रकरण आता भरपाईसाठी स्थापन केलेल्या लवादात पोहोचले आहे. रेल्वेमार्गाचे काम ठप्प आहे. हे प्रकरण १२६ किमी ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेमार्गाशी संबंधित आहे. २०१३ मध्ये रेल्वेने या मार्गाचे सर्वेक्षण केले होते. मलेथामध्ये मोठे रेल्वे स्थानक स्थापन करण्याचे निश्चित झाले होते.

या रेल्वेलाइनच्या मार्गात अनिल किशोर जोशी या माजी कृषी जिल्हा अधिकाऱ्याने भाड्याने घेतलेली जमीनही आली. जोशींनी ३४ जणांची सिंचित जमीन भाड्याने घेतली होती. तेथे तुतीची ७ लाख आणि ३ लाख इतर फळझाडे लावली. ही झाडे मोठी झाली आहेत. नियमानुसार जमिनीवर ज्याची संपत्ती असते, तोच भरपाईसाठी पात्र ठरतो. २०१७ मध्ये रेल्वेच्या तज्ज्ञांच्या पथकाने भरपाईसाठी झाडांची गणना केली. जोशींच्या बागेत ७,१४,२४० तुतीची (मदर प्लांट) आणि २,६३,९८० इतर फळझाडांसह संत्र्याची आणि आंब्याची काही हजार झाडे असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. नियमानुसार, एका फळझाडाच्या मदर प्लांटची भरपाई २,१९६ रुपये होते. या हिशेबाने त्यांच्या बागेतील झाडांच्या भरपाईची रक्कम ४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

काेर्टाने तुतीला संत्र्यासारखे फळझाड मानले, त्यामुळे जास्त भरपाई

एवढी मोठी भरपाई निश्चित झाल्यानंतर प्रशासनाने अनिल जोशींना बोलावून सांगितले की, ‘संत्र्याच्या झाडासाठी २,१९६ रुपये निश्चित आहेत, तुती हे फळझाड नाही. तुमची ही झाडे तुतीची आहेत आणि खूप मोठ्या संख्येत आहेत, त्यामुळे प्रत्येक झाडासाठी ४.५० रुपये भरपाई दिली जाईल.’ जोशी हायकोर्टात गेले. तुती हे फळझाड आहे का, अशी विचारणा हायकोर्टाने उद्यान विभागाकडे केली तेव्हा तुती हे संत्र्याप्रमाणेच फळझाड आहे, त्यामुळे दोन्हींची भरपाईही समान असेल, असे विभागाने मान्य केले. आता प्रकरण लवादाकडे आहे. लवादात सध्या न्यायमूर्तींची नियुक्ती झालेली नाही, त्यामुळे हे प्रकरण प्रलंबित आहे.

झाडे तोडल्याचा बनावट आदेशही दाखवला

काही लोकांनी हायकोर्टाचा बनावट आदेश लवादासमोर ठेवला. त्यात म्हटले होते की, अनिल जोशींची सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे भरपाईचा प्रश्नच नाही. त्यामुळे ही केस बंद करण्यात यावी. अनिल जोशी हायकोर्टात गेले. आदेश बनावट आहे हे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...