आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Trehan Said We Do Not Have Good Facilities If A Large Number Of Children Fall Ill, Guleria Says It Is Necessary To Open Schools For The Development Of Children; News And Live Updates

शाळा उघडण्यावर दुमत:एम्सचे संचालक म्हणतात- शाळा उघडणे आवश्यक! मोठ्या संख्येने चिमुकले आजारी पडल्यास तेवढ्या सुविधा आहेत का? मेदांता अध्यक्षांचा सवाल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मुलांच्या लसीकरणानंतर शाळा उघडावे

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. दरम्यान, देशात काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत देशातील शाळा उघडण्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु, आता शाळा उघडणे सुरक्षित आहे की नाही? किंवा ही योग्य वेळ आहे का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. शाळा उघडण्याबाबत सध्या दोन मोठ्या संस्थांमध्येही मदभेद असल्याचे पाहायले मिळत आहे. मेदांताचे अध्यक्ष डॉ नरेश त्रेहान यांनी शाळा उघडण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 1 सप्टेंबरपासून देशभरात शाळा सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे. परंतु, सध्या देशातील मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने मुले आजारी पडले तर आपल्याला त्यांना चांगल्या सुविधा देता येणार नाही असे त्रेहान यांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे, एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळा उघडणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. डॉ. गुलेरिया यांनी शाळा उघडण्याबाबत तीन कारणे दिले आहेत. देशात गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरात बसून कंटाळले आहेत. त्यांना मागील शैक्षणिक वर्षांचे काहीही लक्षात नाही. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा शाळेची सवय लागायला वेळ लागणार आहे.

मुलांच्या लसीकरणानंतर शाळा उघडावे
डॉक्टर त्रेहान म्हणाले की, शाळा उघडण्याची एवढी घाई का आहे हे आम्हाला समजत नाहीये. मी लोकांना आवाहन करतो की, जोपर्यंत मुलांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत शाळा उघडण्याबाबत निर्णय घेऊ नका. कारण आपल्या देशातील लोकसंख्येचा विचार करता आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असे ते म्हणाले.

डॉ. गुलेरिया यांनी सांगितले तीन कारणे

 • शाळा उघडणे हे केवळ मुलांच्या शिक्षणासाठीच नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे आहे.
 • शाळांमध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनामुळे अनेक मुलांना आहार मिळतो.
 • ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक गरीब शिक्षणापासून वंचित आहेत. दरम्यान, बऱ्याच मुलांना यामुळे शाळा सोडावी लागली. त्यामुळे शाळा उघडणे गरजेचे असल्याचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत मुलांच्या शिक्षणासाठी नवी गाइडलाईन जारी

 • अमेरिकेत 12 वर्षांवरील जास्तीत जास्त मुलांनी कोरोनाची लस घेतलेली असावी.
 • म्हणजेच 12 वर्षांखालील सर्व मुलांची कोरोना चाचणी केली जाईल.
 • जर वर्गात कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर त्याच्या संपर्कातील लोकांना 10 दिवसांसाठी क्वारंन्टाईन केले जाईल.
 • क्वारंन्टाईन असणाऱ्या मुलांना घरीच ऑनलाईन क्लास करावे लागतील. मोठ्या मुलांनादेखील घरीच राहून असाइनमेंट करणे गरजेचे आहे.
 • वैद्यकीय कारणांमुळे लवकर आजारी पडण्याची शंका असलेल्या मुलांसाठी आठवड्यातून एकदा वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाईन शिक्षणासाठी देखील विचार केला जात आहे.
 • विविध वर्गांमध्ये दुपारच्या जेवणाची वेळही वेगवेगळी असेल.
 • शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे 100% लसीकरण असावे.
 • शाळेत वॉश बेसिनची पुरेशी व्यवस्था, लिक्विड साबन ठेवावे लागेल.
 • वरिष्ठ वर्गाच्या शाळांविषयी अभिप्रायानंतर लहान वर्ग उघडले जातील.
बातम्या आणखी आहेत...