आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दुहेरी व्यक्तिमत्त्वासोबत जगणारे लोक आता लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून आपली खरी ओळख जाहीर करण्यासाठी समोर येत आहेत. गुजरातमध्ये असे २० जण समोर आले आहेत, जे शस्त्रक्रियेच्या विविध पातळ्यांपर्यंत पोहोचले आहेत. यात डाॅक्टर, उद्योगपतींचाही समावेश आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचे समोर येणे समाजही हळूहळू स्वीकारत आहे. लोकांचा हा मोठेपणा अशा लोकांना नव्या आयुष्याची भेट देत आहे.
लिंगबदल शस्त्रक्रिया करणारे अनेक जण आपली ओळख लपवण्यासाठी गावात, गल्लीत आधीसारखेच राहतात. प्लास्टिक सर्जन डॉ. हर्ष अमीन सांगतात की, २०२०-२१ मध्ये फक्त अहमदाबादमध्येच अशी शस्त्रक्रिया करणाऱ्यांची संख्या १००० झाली आहे. वर्षभरात ५०-६० रुग्णांनी चौकशी केली, त्यातील १४ पुरुषांची मी शस्त्रक्रियाही केली आहे. अहमदाबादमध्ये माझ्यासारखेच ८० पेक्षा जास्त प्लास्टिक सर्जन आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात तीन पुरुषांची शस्त्रक्रिया केली आहे. ते म्हणाले की, ही कॉस्मेटिक सर्जरी कृत्रिम असते.
अहमदाबादमधील वरिष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत लागवणकर यांनी सांगितले की, मोठ्या रुग्णालयात अशा शस्त्रक्रियेसाठी आठ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. बहुतांश लाेक ओळख लपवण्यासाठी विदेशात अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी जातात, मात्र आता ट्रेंड बदलत आहे. लोक समोर येत आहेत. गेल्या १५ दिवसांत अशा ६ जणांनी शस्त्रक्रिया केली आहे.
२६ वर्षे मुलगा होताे, आता खरी ओळख मिळाली
शस्त्रक्रिया करणारी अध्यासा दालवी हिचे म्हणणे आहे की, नोकरीच्या ठिकाणी आम्हाला भेदभावच नव्हे, शोषणही सहन करावे लागते. म्हणून आम्ही समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणार. देवांशी बजाज नुकतीच लिंगबदल करून महिला झाली आहे. ती म्हणते, मला माहिती आहे की मी कधीच मातृत्वसुख मिळवू शकत नाही. मात्र मला संसार करायचा आहे. मुलांना दत्तक घेऊन आईचे प्रेम देईन. मी २६ वर्षे पुरुष म्हणून राहिले. मात्र आता मला खरी ओळख मिळाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.