आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून संसद भवनापर्यंत तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर सर्व संसद सदस्यांच्या उपस्थितीत रॅलीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. या तिरंगा रॅलीत एनडीएचे अनेक नेते आणि खासदारही सहभागी झाले होते. खासदार व्ही.के. सिंह बुलेटवर तिरंगा लावून रॅलीत सामील झाले. स्मृती इराणी आपल्या स्कूटरवर तिरंगा फडकावला. यावेळी त्या सर्वात आघाडीवर होत्या. याशिवाय केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखीही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. विजय चौकात रॅलीचा समारोप झाला.
सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजन
सांस्कृतिक मंत्रालयाने तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवण्याचे आवाहनही देशातील सर्व जनतेला करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 20 कोटी तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना या रॅलीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
हा कार्यक्रम भाजपने नव्हे तर सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केला आहे, असे जोशी म्हणाले होते. त्यांनी सर्व खासदारांना बुधवारी सकाळी 8.30 वाजता लाल किल्ल्यावर पोहोचण्यास सांगितले होते.
PM यांचे आवाहन - सोशल मीडिया प्रोफाइलवर तिरंगा लावा
मन की बातच्या 91 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यासाठी अमृत महोत्सव मोहिमेत जास्तीत जास्त लोक सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडित अशा रेल्वे स्थानकांची माहिती घेण्यास सांगितले आहे. त्यांनी आवाहन केले की 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरातील लोकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा आणि त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये तिरंगा लावण्याबाबतही आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर देशातील अनेकांनी तिरंगा आपल्या सोशल मीडिया डीपीवर लावला आहे. मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी डीपीवर राष्ट्रध्वज तिरंगा लावल्याबद्दल लोकांचे कौतुक केले.
जेपी नड्डा म्हणाले -घरोघरी तिरंगा लावण्यासाठी जनजागृती करा
संसदीय पक्षाच्या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा केली. त्यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेवर अधिक भर दिला आणि भाजप खासदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना या मोहिमेशी जोडण्यास सांगितले.
बैठकीत जेपी नड्डा यांनी खासदारांना सांगितले की, प्रत्येक घरात तिरंगा लावण्यात यावा यासाठी तशी वातावरण निर्मिती करा. यावेळी त्यांनी घरोघरी तिरंगा मोहिमेबाबत लोकांना जागरुक करण्याबाबत सांगितले. ते म्हणाले की, 13 ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरात तिरंगा लावावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.