आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलिस्तानींसह इंग्रजांना परराष्ट्रमंत्र्यांनी दिला इशारा:तिरंग्याचा अवमान हाेऊ देणार नाही, उलट सन्मान वाढवेन

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खलिस्तानींनी तिरंग्याला दिलेल्या वागणुकीच्या अनेक घटनांनंतर भारताने कडक संदेश दिला आहे. भारत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान सहन करणार नाही, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर रविवारी धारवाडमध्ये म्हणाले, अशा घटनांना भारताने सहज घेण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. पूर्वीचा भारत आता राहिलेला नाही. भारत राष्ट्रध्वजाला काेसळू देणे कदापिही स्वीकारणार नाही. हा केवळ खलिस्तानींना नव्हे तर इंग्रजांनाही एक संदेश आहे. हा माझा ध्वज आहे आणि काेणी याचा अनादर करण्याचा प्रयत्न करणार असेल मी हा ध्वज आणखी माेठा करेल, असे त्यातून स्पष्ट केल्याचे जयशंकर यांनी सांगितले. पश्चिमेकडील देश इतर देशांच्या अंतर्गत प्रकरणांत नाक खुपसतात. त्यांची ही सवय जुनी आहे. विशेष म्हणजे आपल्याला हा ‘ईश्वराने दिलेला अधिकार’ असल्याचे त्यांना वाटते, अशा शब्दांत जयशंकर यांनी समाचार घेतला .

भारतासाठी जग कामाचे ठिकाण तीन काेटींहून जास्त भारतवंशीय लाेक परदेशात काम करत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत. संपूर्ण जग भारतासाठी एक कामाचे ठिकाण आहे.जागतिक अर्थव्यवस्था काेविड महामारीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत असताना भारताने ७ टक्के विकासदर गाठला, असे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले.