आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Trinamool Party Update | Lakshmi Ratan Shukla Resigned As Sports Minister, Likely To Join BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ममता बॅनर्जींना अजून एक झटका:लक्ष्मी रतन शुक्ला यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, 16 दिवसांपूर्वी शुभेंदुसह 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममता म्हणाल्या- कुणीही राजीनामा देऊ शकतो

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अजून एक झटका बसला आहे. ममता सरकारमधील क्रीडा राज्य मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्ला बंगाल सरकारमध्ये यूथ सर्विस आणि स्पोर्ट्स मिनिस्टर होते. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री आणि राज्यपाल जगदीप धनखड यांना पाठवला आहे. परंतू, अद्याप त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिलेला नाही. यापूर्वी ममता बॅनर्जींच्या अंत्यंत जवळचे आणि बंगाल सरकारमधील माजी मंत्री शुभेंदु अधिकारी यांच्यासह 10 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ममता म्हणाल्या- कुणीही राजीनामा देऊ शकतो

यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कुणीही राजीनामा देऊ शकतो. या राजीनाम्याला वेगळ्या अर्थाने घेऊ नका. लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले की, यापूर्वी खेळावर जास्त भर द्यायचा आहे, आमदार पदावर कायम असेल.

राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या चर्चा

बंगालच्या रणजी संघाचे माजी कर्णधार लक्षी रतन शुक्ला हावडा उत्तरमधून तृणमूलचे आमदार आहेत. सूत्रांनी सांगितले की, आपल्या राजीनाम्यात शुक्ला यांनी राजकीय संन्यास घेण्याची इच्छा जाहीर केली आहे. शुक्ला यांनी आपल्या मंत्रिपदासोबतच हावडाच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे.

मागच्या महिन्यात शुभेंदु अधिकारींनी भाजपमध्ये प्रवेश केला होता

मागच्या महिन्यात 19 डिसेंबरला तृणमूलमधून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन शुभेंदु अधिकारींनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि 10 आमदारांनीही भाजपचे कमळ हाती घेतले. यातील पाच आमदार तृणमूलचे होते.

बातम्या आणखी आहेत...