आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारी संपुष्टात येताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केली. ते सिलिगुड रेल्वे स्पोर्ट मैदानावर आयोजित एका रॅलीत बोलत होते. ते म्हणाले -'ममता तिसऱ्यांदा विजयी झाल्यामुळे त्या सुधारतील असे आम्हाला वाटले होत्या. पण, त्या सुधारल्या नाही. त्यामुळे जोपर्यंत त्या बंगाली जनतेवरील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, गुन्हेगारी संपवार नाहीत, तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही.'
'निवडणुकीनंतर बंगालमध्ये झालेला हिंसाचार पासून मानवाधिकार संघटनेही येथे कायद्याचे राज्य नव्हे तर सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते,' असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोना संपताच CAA लागू होईल
अमित शाह यांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) मुद्यावरुनही ममतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'सीएएची अंमलबजावणी होणार नसल्याची अफवा तृणमूलतर्फे पसरवली जात आहे. पण, कोरोनाची लाट संपल्यानंतर तत्काळ या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. सीएए वास्तविकता असून, ती राहणार. भाजप बंगालची घुसखोरीची समस्या निकाली काढेल.'
अमित शहा म्हणाले -'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत 2 वर्षे जनतेला मोफत अन्नधान्य दिले. पण, ममतांनी त्यात आपला फोटो लावला. गोरखपूरहून सिलीगुडीपर्यंत 31 हजार कोटी रुपयांच्या 545 किमी लांबीच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.'
शाह म्हणाले -बंगालमध्ये वीज महाग
'देशात सर्वाधिक वीज दर बंगालमध्ये आहेत. देशात बंगालमध्ये पेट्रोल 115 रुपये प्रतिलीटर दराने विकले जाते. याऊलट भाजपचे सरकार असलेल्या राज्यांत पेट्रोल 105 रुपये दराने मिळते. आजही येथील नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत नाही,' असे शहा म्हणाले. ते म्हणाले, 'ममतांनी बंगालला आर्थिकदृष्ट्या कंगाल केले. 1947 मध्ये देशाच्या जीडीपीत बंगालचा वाटा 30 टक्के होता. तो 2022 मध्ये घसरुन 3.3 टक्क्यांवर आला आहे. ममता या प्रश्नाचे उत्तर बंगाली जनतेला देणार काय?'
ममता म्हणाल्या -'2024 मध्ये भाजप सत्तेत परतणार नाही'
अमित शहा यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही त्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या -जर हीच भाजपची योजना असेल तर ते संसदेत या विधेयकावर चर्चा का करत नाहीत. या कायद्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या हक्कांवर गदा येऊ नये अशी आपली इच्छा आहे. भाजपचा 2024 च्या निवडणुकीत पराभव होईल. त्यामुळे त्यांनी एका वर्षांनंतर येथे येऊन बाष्कळ बडबड करावी.'
त्या पुढे म्हणाल्या -'शहा गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी दिल्लीत लक्ष्य घालावे. दिल्लीच्या जहांगीरपुरी, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात काय घडले. त्यांच्याकडे बंगाल नाही. त्यामुळे त्यांनी अशी वायफळ चर्चा करु नये. भाजप जनतेत फूट पाडत आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.