आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tripura Former Cm Biplab Deb House Attacked; Ncestral House Vandalized | Vehicles On Fire | Tripura

त्रिपुरा:माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या वडिलोपार्जित घराची तोडफोड, हल्लेखोरांनी अनेक वाहने पेटवली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या घरांची तोडफोड करून आग लावली. याचा आरोप भाजपने CPM समर्थकांवर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पक्षाच्या झेंड्याचेही नुकसान केले, तसेच दुकान आणि काही वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली.

बिप्लब देब यांचे दिवंगत वडील हिरुधन देब यांच्या स्मरणार्थ बुधवारी येथे वार्षिक श्राद्ध विधीचे आयोजन करण्यात येणार होते, परंतु एक दिवस आधी CPM समर्थकांनी ही घटना घडवून आणली.

बातम्या आणखी आहेत...