आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री होतील. भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण, काही आमदारांनी त्यांच्या नावावर आक्षेप नोंदवत बैठकीनंतर मोठा गदारोळ केला. तत्पर्वी, सायंकाळी 4.30 वा. बिल्पव देव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. राजीनाम्यानंतर ते म्हणाले -2023 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मी राजीनामा दिला. या प्रकरणी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बिल्पव यांची त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांनी शुक्रवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यात शहा यांनी त्यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
माणिक साहा त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष व राज्यसभेचे खासदार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जिष्णु देव वर्मा यांचेही नाव होते. पण, नंतर ते मागे पडले. त्रिपुरात फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक होणार आहे. बिप्लवर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने भूपेंद्र यादव व विनोद तावडे यांची पक्ष निरिक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
बिप्लव देव गत 4 वर्षांपासून भाजप व इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराच्या (आयपीएफटी) सरकारचे नेतृत्व करत होते. त्यांनी आपला राजीनामा का दिला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, यामागे भाजपश्रेष्ठींचे आदेश असल्याचे मानले जात आहे.
त्रिपुरामध्ये येत्या 8 महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. त्यामुळे भाजपने येथे नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बिप्लव देव यांनी शुक्रवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याची भेट घेतली होती. त्यात त्यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देव यांनी आपल्याला 2023 च्या निवडणुकीची तयारी करावयाची असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच पक्षाचा आदेश सर्वोतपरी असल्याचेही ते म्हणाले होते.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आगरतळ्याला पोहोचलेत. ते भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहतील. या बैठकीत त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्याचा निर्णय होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार माणिक सहा आघाडीवर आहेत. याशिवाय, उप मुख्यमंत्री जिश्रु देव वर्मा यांचेही नाव चर्चेत आहे. त्रिपुरात फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक होणार आहे.
बिल्पव म्हणाले -मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता
राजीनाम्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बिप्लव म्हणाले -"आमच्यासाठी पक्ष सर्वोतपरी आहे. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. हायकमांडने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर आता राजीनामा देण्याची सूचना केली. त्यानुसार मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी निवडणुकीला अद्याप अवकाश असल्याचे सांगितले. यापुढे मी पक्ष मजबूत करण्यासाठी काम करेल."
नव्या मुख्यमंत्र्याची निवड 2023 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केली जाईल. भाजप यावेळी गतवेळच्या "चलो पलटाईं" या लोकप्रिय नाऱ्याऐवजी विकास कामांच्या मुद्यावर जनतेच्या दरबारात जाण्याच्या प्रयत्नांत आहे.
2018 मध्ये त्रिपुरात प्रथमच आले होते भाजपचे सरकार
त्रिपुरात 2018 मध्ये भाजपचे पहिल्यांदा सरकार आले होते. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ बिप्लव यांच्या गळ्यात पडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, गत महिन्यात जवळपास 14 भाजप आमदारांच्या एका गटाने पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. प्रत्येकवेळी बिप्लव देव यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण, पक्षश्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
11 महिन्यांत 4 राज्यांत नेतृत्वबदल
भाजपने मागील 11 महिन्यात 4 राज्यांतील मुख्यमंत्री बदलले. गतवर्षी जुलै महिन्यात तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्याच महिन्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन बी. एस. येडियुरप्पा यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी बस्वराज बोम्मई यांना संधी देण्यात आली. भाजपने गत सप्टेबर महिन्यात विजय रुपाणी यांच्या जागी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र भाई पटेल यांची नियुक्ती केली. आता त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.