आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईशान्येतील 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा आणि नागालँडचे निकाल हाती आले आहेत. दोन्ही राज्यात भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. नागालँडमध्ये भाजप आघाडीला 37 तर त्रिपुरामध्ये 33 जागा मिळाल्या आहेत.
NPP मेघालयातील सर्वात मोठा पक्ष
मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांचा एनपीपी मेघालयातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. NPP च्या खात्यात फक्त 26 जागा आल्या आहेत. मतदानानंतर, एक्झिट पोलने त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मेघालयमध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता होती.
संगमा शहांची फोनवरुन चर्चा
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून सरकार स्थापन करण्यासाठी मदत मागितली.
आता तीन राज्यांमध्ये आतापर्यंत मिळालेले निकाल आणि ट्रेंड समजून घ्या...
1. त्रिपुरात भाजपला बहुमत
त्रिपुरामध्ये 86.10% मतदान, गत निवडणुकीपेक्षा 4% कमी
16 फेब्रुवारी रोजी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 60 जागांवर 86.10% मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 4 टक्के कमी आहे. 2018 मध्ये त्रिपुरामध्ये 59 जागांवर 90% मतदान झाले होते. 35 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. यासह भाजपने डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. गेल्या निवडणुकीत विजयानंतर पक्षाने बिप्लब देव यांना मुख्यमंत्री बनवले, पण मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. साहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणूक लढवली.2023 च्या निवडणुकीत, भाजपने सर्व 60, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे.
2. मेघालयचा कल, NPP सर्वात जास्त जागांवर पुढे
मेघालय : 85.27% मतदान, गत निवडणुकीपेक्षा 10% जास्त
मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला 60 पैकी 59 जागांवर मतदान झाले होते. 85.27% मतदान झाले. यूडीपी उमेदवार एचडीआर लिंगडोह यांच्या निधनामुळे सोह्योंग जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 2018 मध्ये 67% मतदान झाले होते. यावेळी एनपीपीने 57, काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 60 आणि टीएमसीने 56 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत.
मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) 19 जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स (MDA) ची स्थापना केली. एनपीपीचे कोनराड संगमा मुख्यमंत्री आहेत.
3. नागालँडमध्येही भाजप बहुमताकडे
नागालँडमध्ये 85.90% मतदान
27 फेब्रुवारी रोजी नागालँडमधील 16 जिल्ह्यांतील 60 पैकी 59 विधानसभा जागांवर 85.90% मतदान झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 10% अधिक आहे. 2018 मध्ये येथे 75% मतदान झाले होते. येथे 10 फेब्रुवारी रोजी अकुलुटो विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार खेकाशे सुमी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यानंतर भाजपचे उमेदवार काजेतो किनीमी यांची बिनविरोध निवड झाली. नागालँडमध्ये सध्या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत.
NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर एनडीपीपीने 18, तर भाजपने 12 जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. सरकारमध्ये NDPP, BJP NPP आणि JDU यांचा समावेश आहे.
ग्राफिक्समध्ये पाहा 10 वर्षांतील भाजपचा प्रवास
महत्त्वाचे अपडेट्स...
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयचे एक्झिट पोल ग्राफिक्समध्ये पाहा...
असा होता निवडणूक कार्यक्रम
वाचा निवडणूक संदर्भातील अन्य बातम्या
दिव्य मराठी एक्सप्लेनर5 वर्षात 47 वेळा ईशान्येकडे गेले मोदी:8 पैकी 6 राज्यांमध्ये सरकार; त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय भाजपसाठी महत्त्वाचे का?
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. ती टिकवण्यासाठी पक्षाने कोणतीही कसर सोडलेली नाही. मेघालयमध्ये, निवडणुकीपूर्वी, भाजपने नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सोबत संबंध तोडले. वास्तवीक एनपीपीनेच भाजपला सत्तेवर आणले होते. पक्षाने मेघालयातील सर्व 60 जागा लढवल्या, 2018 मध्ये भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. - येथे वाचा संपूर्ण बातमी
रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश
नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश आले आहे. त्यांच्या नागालँड विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या आहेत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.