आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आज (बुधवार) दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहादेखील उपस्थित होते. आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर हा सोहळा सुरू आहे.
सीएम माणिक साहा यांच्यानंतर संताना चकमा, प्रणजित सिंग, सुशांत चौधरी, रतन लाल नाथ, टिंकू रॉय, विकास देबबर्मा, सुधांशू दास आणि सुक्ला चरण नोआटिया यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
पाहा शपथविधीदरम्यानची छायाचित्रे...
भाजप-आयपीएफटी आघाडीला 11 जागांवर नुकसान
त्रिपुरामध्ये भाजप आणि आयपीएफटीने युती करून निवडणूक लढवली. त्यांना 2018च्या निवडणुकीच्या तुलनेत 11 जागांचे नुकसान झाले. त्यानंतरही या आघाडीने 33 जागा जिंकून बहुमत मिळवले. राज्यात भाजपला 32, तर आयपीएफटीला फक्त 1 जागा मिळाली. दुसरीकडे, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सीपीआय(एम) आणि काँग्रेस आघाडीने राज्यात 14 जागा जिंकल्या आणि 2 जागांचे नुकसान झाले होते. तर, टीपीएमने राज्यात 13 जागा जिंकल्या होत्या.
राज्यातील 60 विधानसभा जागांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. 2 मार्च रोजी निकाल आले, भाजपने बहुमत मिळवले. 2023च्या निवडणुकीत भाजपने सर्व 60 जागांवर, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली. 2018 च्या निवडणुकीत भाजपला 35, सीपीआयएमला 16 आणि आयपीएफटीला 7 जागा मिळाल्या होत्या. भाजपने सरकार स्थापन केले होते.
त्रिपुरामध्ये 86.10% मतदान, गत निवडणुकीपेक्षा 4% कमी
16 फेब्रुवारी रोजी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 60 जागांवर 86.10% मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 4 टक्के कमी आहे. 2018 मध्ये, त्रिपुरामध्ये 59 जागांवर 90% मतदान झाले होते. 35 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यासह भाजपने डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. गेल्या निवडणुकीत विजयानंतर पक्षाने बिप्लब देव यांना मुख्यमंत्री बनवले, पण मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. साहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ही निवडणूक लढवली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.