आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Lifts Ban On Hydroxychloroquine After Donald Trump Threatens Of Retaliation Corona News And Updates

कोरोना:ट्रम्प यांनी धमकावल्याच्या अवघ्या 6 तासांत भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात बंदी केली शिथील! इतरांना देणार पण देशाला प्रथम प्राधान्य

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • ट्रम्प यांनी मोदींशी फोनवर केले होते हाइड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवठ्याचे आवाहन

कोरोना व्हायरसविरोधात लढताना भारत सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि पॅरासिटामॉल औषधींवर आंशिक निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘हा निर्णय मानवतेच्या आधारावर घेण्यात आला आहे. भारताकडून अपेक्षा ठेवणाऱ्या देशांना या औषधी पाठवल्या जाणार आहेत. तरीही देशांतर्गत गरजांना प्रथम प्राधान्य देऊन स्टॉकच्या उपलब्धतेनुसार निर्यात केले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आवाहन केले होते की कोरोनाशी दोन हात करताना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात करावे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले,  ‘‘या औषधी कोरोनाचा सर्वात वाइट फटका बसलेल्या देशांना पाठवल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाला कुठल्याही प्रकारचे राजकीय रंग देऊ नका. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही.’’ वैज्ञानिकांनी सुद्धा मलेरियाविरोधी काम करणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध कोरोना विरोधात यशस्वी असल्याचे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असे धमकावले होते...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भारताला धमकीच दिली होती. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यातीवर बंदी हटवली नाही तर कारवाई केली जाऊ शकतो. अमेरिकेने दिलेल्या औषधींचे ऑर्डर का थांबवण्यात आले याचे मला योग्य कारण दिसतच नाही. व्हाइट हाउसमध्ये पत्रकार परिषद घेत ट्रम्प म्हणाले, ‘‘मी मोदींच्या निर्णयाबद्दल ऐकलेले नाही. मला माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या देशांना या औषधी निर्यात करण्याचा निर्णय थांबवून ठेवला आहे. नुकतेच मोदींशी बोलणे झाले. भारताचे अमेरिकेसोबत खूप चांगले संबंध आहेत. आता पाहावे लागेल की ते औषधी पाठवण्याला परवानगी देतात की नाही.’’ ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोदींनी सांगितले होते की सरकार अमेरिकेला औषधी पाठवण्याचा विचार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...