आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यावधी निवडणुक:अमेरिकेतील सहा राज्यांमधील उमेदवारांच्या विजयामुळे ट्रम्प यांचे हात आणखी बळकट

अमेरिका16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकीच्या प्रायमरीमध्ये रिपब्लिकन पार्टीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्थिती आणखी बळकट झाली आहे. मंगलवारी दक्षिण कॅरोलिना,अलाबामा, अरकन्सा, नेवाडा, जॉर्जिया, टेक्सासमध्ये ट्रम्प समर्थक उमेदवारांनी विजय मिळवला आहे. आतापर्यंत एकूण २८ राज्यांत झालेल्या प्रायमरीमध्ये ट्रम्प समर्थक रिपब्लिकन पार्टीचे नेते २१ राज्यांत विजयी झाले. दक्षिण कॅरोलिनामध्ये ट्रम्प यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला.

कॅपिटल हिंसाचारानंतर ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाचे समर्थन करणारे व पाचवेळचे रिपब्लिकन प्रतिनिधी टिम राइस प्रायमरीत पराभूत झाले आहेत. नेवाडामध्ये ट्रम्प समर्थक दोन नेते प्रायमरीत विजयी झाले. या नेत्यांनी ट्रम्प यांच्या धर्तीवर बायडेन यांना निवडणुकीत बोगस असल्याचे म्हटले होते. अमेरिकेत निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पार्टीला पक्षांतर्गत उमेदवारीसाठी मतदारांकडून मत मिळवावे लागतात. प्रायमरीतील विजयी व्यक्ती मुख्य निवडणुकीत पक्षाचा उमेदवार ठरतो.

बातम्या आणखी आहेत...