आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएखाद्या शाळेची ओळख त्याच्या नावाऐवजी तेथे शिकवल्या जाणाऱ्या लिपीद्वारे व्हावी... हे शक्य आहे? होय, प. बंगालच्या नदिया जिल्ह्यातील कल्याणी येथील ही शाळा आहे. येथे शिकवली जाणारी लिपी ओलचिकी शाळेत आहे. कल्याणीला पोहोचताच स्थानिक लोकांना शाळेबाबत विचारले असता उत्तर मिळाले...अच्छा ओलचिकी शाळा. ही बंगालची पहिली संथाली भाषेतील ओलचिकी लिपीत शिक्षण देणारी शाळा आहे. तसेच नदिया जिल्ह्याची एकमेव संथाली माध्यमाची शाळाही आहे. यानंतर पुरुलिया, बांकुडा, हुगळी, उत्तर व दक्षिण दिनाजपूरसह इतर जिल्ह्यांतही संथाली माध्यमाच्या शाळा उघडल्या. शाळेच्या प्रवेशद्वारावरच आदिवासी समाजाचे शिक्षक, साहित्यिक व नाटककार पंडित रघुनाथ मुर्मू यांचा पुतळा आहे. संथाली समाजासाठी रघुनाथ मुर्मू हे धार्मिक गुरू आहेत. तथापि, शाळेचे नाव वीर सिद्धू कान्हूनगर हायस्कूल आहे. येथे दोन इमारतींत पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेचे शिक्षक पांचू गोपाल हेम्ब्रम सांगतात, ‘२००३ मध्ये संथालीचा घटनेच्या आठव्या अनुसूचीत समावेश झाला. तेव्हापासूनच संथाली भाषेत शिक्षणाची मागणी जोर धरू लागली.’ यानंतर बंगालीसह संथाली भाषेतून शिक्षणाची सुरुवात झाली, पण आदिवासींना संपूर्ण शिक्षण संथाली भाषेतूनच हवे होते. २०१३ मध्ये त्यांची ही मागणीही मान्य झाली.
या वर्षापासूनच शाळेने आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांना बंगाली शिकवणे सुरू केले. हेम्ब्रम सांगतात, ‘ओडिशा, झारखंड, आसामातूनही मुले येथे शिकण्यासाठी येतात. येथे नि:शुल्क शिक्षण दिले जाते. मुलांकडून वार्षिक प्रवेश शुल्क म्हणून केवळ २४० रुपये घेतले जातात.’
पहिली शाळा २०१४ मध्ये कल्याणीच्या अदिवासी कॉलनीत बंगालची पहिली संथाली माध्यमाची शाळा उघडली. २०१४ पासून स्कूल इन्चार्ज बुलन मुर्मू हे इतिहासाचे शिक्षक आहेत. ते म्हणाले, सुरुवातीला ६४ विद्यार्थी-विद्यार्थिनी होते. सध्या २२७ आहेत. पैकी ५० मुलीही आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.