आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या १३ वर्षांपासून तडे गेल्याने कोसळण्याच्या मार्गावर असलेले जोशीमठ आता भूजल गळतीमुळे दहशतीत आहे. २५ हजार लोकसंख्येच्या या शहराचा दिवस कटतो, पण रात्र थांबते. एनटीपीसीच्या हायडल प्रकल्पाच्या ज्या बोगद्याला व चारधाम ऑल-वेदर रस्ता (हेलंग-मारवाडी बायपास) बांधकामाला या स्थितीसाठी जबाबदार ठरवले जात आहे त्याचे काम दोन दिवसांपासून कागदावर बंद आहे. मात्र, प्रत्यक्षात जागेवर सुरू आहे. विशेष म्हणजे सध्या या भागात हिमवर्षाव झाला नाही. बर्फवृष्टीने छत कोसळण्याची भीती सुनील गावच्या नेहा सकलानी यांनी व्यक्त केली. भिंतींना तडे गेले असून पायाखालची जमीन खचत आहे. रविग्राम वाॅर्डातील १५० घरांतील लोकही दहशतीत आहेत. सुमेधा भट्ट (४०) सांगतात, ‘तडे २०२० मध्ये दिसायला लागले होते, पण ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पावसाच्या पुरानंतर हे तडे रुंद-खोल झाले. बाथरूमचा दरवाजा पाच-सहा इंच खचला आहे. चौकटीत गॅप असल्याने अनेक दरवाजे बंद होत नाहीत.’ शुक्रवारी सायंकाळी सिंगधर वाॅर्डातील एक मंदिर कोसळले. तडे गेल्याने १५ दिवसांपासून तिथे कुणीही जात नव्हते. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या निर्देशावरून जोशीमठात एनडीआरएफ तैनात केले आहे. तात्पुरते मोठे निवारा केंद्रही उघडण्यात येईल. घरोघरी सर्वेक्षणही सुरू केले आहे.
भूवैज्ञानिकांनी २००९ मध्ये दिला होता घातक परिणामांचा इशारा
६०० कुटुंबांचे तत्काळ स्थलांतर, भत्ता मिळेल
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी धोकादायक घरांत राहणाऱ्या ६०० कुटुंबांचे तत्काळ स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. घर सोडणाऱ्यांना सरकार ४ हजार रुपये महिना भाडेभत्ता देईल. सीएमच्या निर्देशावरून एनडीआरएफ तैनात केले आहे. पुनर्वसन केंद्र उभारले जात आहे. घराघरात सर्व्हे होत आहे.
केंद्राकडून समिती स्थापन : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने भेगांच्या प्रभावाचा ‘जलद अभ्यास’ करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ती ३ दिवसांत अहवाल देईल, तर सीएम धामी शनिवारी जोशीमठला जातील. गढवाल आयुक्त आणि आपत्ती व्यवस्थापन सचिव जोशीमठातच आहेत.
भास्कर एक्स्पर्ट
{प्रा. एस. पी. सती, भूगर्भशास्त्रज्ञ
{विक्रम गुप्ता, भूस्खलनतज्ज्ञ
शहर वाचवणे कठीण, आधी लोकांना वाचवा रविग्राम, गांधीनगर व सुनील वाॅर्डांत सर्वाधिक धोका आहे. औली-जोशीमठ रस्त्याच्या कडेलाही तडे गेले आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये जोशीमठाचा सर्व्हे करणाऱ्या भूवैज्ञानिकांनी २००९ मध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी एनटीपीसी बोगद्याच्या घातक परिणामांचा इशारा दिला होता. बोगदा खोदण्यासाठी जमिनीखालील पाण्याची संरचना खिळखिळी केली. यामुळे रोज ६-७ लाख लिटर पाणी निघत आहे. आता जोशीमठ शहराचे अस्तित्व वाचवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे सरकारने आधी लोकांना वाचवले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.