आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीएमसी राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गाेखले यांना अटक:पंतप्रधान मोदी यांच्या मोरबी दौऱ्यावर फेक न्यूज केले होते ट्वीट

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या गुजरातेतील माेरबी दौऱ्याबाबत फेक न्यूज ट्वीट करण्याच्या आराेपावरून मंगळवारी सकाळी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गाेखले यांना अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद सायबर सेलने एका नागरिकाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केली. गोखले हे दिल्लीहून जयपूरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पंतप्रधानांच्या मोरबी दौऱ्याबाबत फेक न्यूज पसरवल्याचा आराेप आहे. गोखलेंनी १ डिसेंबरला ट्वीटमध्ये दावा केला होता की, मोरबीत पूल कोसळल्यानंतर मोदींच्या काही तासांच्या दौऱ्यासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...