आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twelve People, Including Two Children From Nagpur Trapped In The Flood In Chindwada, Rescued After 8 Hours

नागपुरातील कुटुंबाला पिकनिक पडली महागात:धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील 2 मुलांसह 12 जण अडकले पुरात, मोठ्या मुश्लिकीने झाली सुटका

छिंदवाडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखेर मोठ्या मुश्किलीने रात्री 11 वाजता 12 जणांना वाचवण्यात आले

सध्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नदी-नाले-धबधबे ओसांडून वाहत आहे. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण जात आहेत. पण नागपुरमधील एका कुटुंबाला पिकनिक चांगलीच महागात पडली आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील घोघरा धबधब्याजवळ ही कुटुंब तब्बल आठ तास पुराच्या पाण्यात आडकले. मंगळवारी रात्री 11 वाजता सर्वांना सुरक्षित वाचवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमधील गुर्जर कुटुंब छिंतवाडामधील घोघरा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. दुपारी पाणी कमी असल्यामुळे हे कुटुंबिय धबधब्यातील एका बेटावर गेले. पण, तीन वाजेच्या नंतर अचानक पाण्याची पातळी वाढली आणि मोठा पूर आला. पुरामुळे या कुटुंबाला बाहेर येता आले नाही. अखेर तेथील काही लोकांनी पोलिसांना घटनेची सूचना दिली.

पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. पाण्याचा प्रवास आणि अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. पण, अखेर मोठ्या मुश्किलीने रात्री 11 वाजता 12 जणांना वाचवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...