आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Twenty Chargesheets Have Been Filed Against 82 People From 20 Countries In The Markaz Case Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:मरकज प्रकरणात 20 देशांतील 82 जणांविरुद्ध 20 आरोपपत्र दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना महामारी पसरवण्यासारखे गंभीर आरोप

मरकज प्रकरणात ३१ मार्च रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सध्या २० आरोपपत्रांत ८२ विदेशी नागरिकांना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांवर महामारी अधिनियम आणि व्हिसा नियमाचे उल्लंघन केल्याचा तसेच देशात कोरोना महामारी पसरवण्यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. हे ८२ आरोपी २० विविध देशांतील आहेत.

दिल्ली पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितले, सध्या २० आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. यात सर्व आरोपी विदेशी आहेत. या सर्वांनी पर्यटन व्हिसावर तबलिगी मरकजसाठी प्रवास केला होता. हे सर्व काही काळ तबलिगी मरकजमध्ये (निजामुद्दीन वस्ती) राहिले होेते. या विदेशी पाहुण्यांनी व्हिसा नियम धाब्यावर बसवले. शिवाय महामारी अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप यात आहे.

अद्याप कुणालाही अटक नाही

निजामुद्दीन मरकज प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. दिल्ली हायकोर्टात मंगळवारी पोलिसांनी ही माहिती दिली. मरकजमध्ये सहभागी ९१६ विदेशी नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी याचिकेत होती. यावर कोर्टाने दिल्ली सरकार व पोलिसांना म्हणणे मांडण्यास सांगितले होते. मात्र, कोविड १९च्या पार्श्वभूमीवर या सर्वांना ३० मार्चपासून क्वॉरंटाइन ठेवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...