आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twitter Contraversy Updates: Last Chance To Twitter, Now Warning Of Legal Action If Rules Are Broken Central Government; News And Live Updates

ब्ल्यू टिकवर वाद:ट्विटरला अखेरची संधी, आता नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा; उपराष्ट्रपती-सरसंघचालकांच्या अकाउंटवरून ब्ल्यू टिक हटली अन् परतली

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने 25 फेब्रुवारीला माहिती तंत्रज्ञान नियम 2021 जाहीर केले होते

नवे आयटी नियम लागू न केल्याने शनिवारी सरकारने ट्विटरला अंतिम नोटीस पाठवली. यात म्हटले आहे की, २६ मेपासून लागू सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमांचे ट्विटरने त्वरित पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे ट्विटरने शनिवारी अचानक टाकलेल्या पावलांनंतर केंद्राने ही नोटीस बजावली.

सकाळी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खासगी अकाउंटची ब्ल्यू टिक हटवली. नंतर काही वेळाने ती पुन्हा बहाल केली. सरसंघचालक मोहन भागवत व संघाच्या इतर नेत्यांच्या अकाउंटमधूनही ब्ल्यू टिक हटवण्यात आली. संध्याकाळी पुन्हा बहाल करण्यात आली. अकाउंट निष्क्रिय राहिल्यास ब्ल्यू टिक हटवली जाते असे ट्विटरचे म्हणणे आहे.

नायडूंंच्या अकाउंटवरून गैरसमजातून ब्ल्यू टिक हटवल्याचे कंपनीने म्हटले आहे. नायडू यांच्या अकाउंटवरून शेवटचे ट्वीट २३ जुलैला करण्यात आले. आधी ते अकाउंट जुलै २०२० पासून निष्क्रिय असल्याचे मानण्यात आले. सरसंघचालक व इतर संघ नेत्यांच्या अकाउंटवरून ब्ल्यू टिक हटवणे व बहाल करण्याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही.

फेब्रुवारीत बनवले नवे नियम
केंद्राने २५ फेब्रुवारीला माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ जाहीर केले होते. ते लागू करण्यासाठी तीन महिने दिले होते. नवे नियम सोशल मीडिया, ओटीटी व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी आहेत. त्यानुसार संबंधित कंपन्यांना मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी व तक्रार अधिकारी नियुक्त करायचा आहे. ट्विटरने अद्याप या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची माहिती सरकारला दिलेली नाही.

घटनाक्रम समजून घ्या...

  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाउंटची ब्ल्यू टिक हटवली.
  • सोशल मीडियावर वादानंतर ट्विटरने स्पष्टीकरण देत परत दिली.
  • सरसंघचालक व इतर संघ नेत्यांच्या अकाउंटवरून ब्ल्यू टिक हटवली.
  • केंद्राने ट्विटरला आयटी नियमांन्वये अंतिम नोटीस बजावली.
  • संघ नेत्यांच्या अकाउंटवरून हटवलेली ब्ल् टिकही बहाल.
बातम्या आणखी आहेत...