आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twitter India Head Manish Maheshwari | Twitter India MD TO Move US Senior Director Revenue Strategy

ट्विटरच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये फेरबदल:ट्विटर इंडियाने एमडी मनीष माहेश्वरी यांना पदावरुन हटवले, नवीन जबाबदारीसह पाठवले अमेरिकेत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर इंडियाने एमडी मनीष माहेश्वरी यांना पदावरून काढून टाकले आहे. त्यांना वरिष्ठ संचालक म्हणून अमेरिकेत पाठवण्यात आले आहे. ते नवीन बाजारपेठांमधील महसूल, धोरण आणि कामकाजाचे निरीक्षण करणार आहे. भारतात मनीष हे एमडी असताना ट्विटर अनेक वादात अडकले होते. ट्विटरच्या भारतातील सेल्स हेड कनिका मित्तल आणि बिझनेस हेड नेहा शर्मा कत्याल मनीष यांच्या जागी ट्विटर इंडियाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जात आहे.

ट्विटरचे वरिष्ठ कार्यकारी यू सासामोटो यांनी शुक्रवारी ट्विटरवर हे स्पष्ट केले आहे. त्यांनी लिहले की 2 वर्षांहून अधिक काळ आमच्या भारतीय व्यवसायाचे नेतृत्व केल्याबद्दल मनीष माहेश्वरी यांचे धन्यवाद. अमेरिकेतील त्यांच्या नवीन भूमिकेबद्दल, जगभरातील नवीन बाजारांसाठी महसूल धोरण आणि संचालनाचे प्रभारी म्हणून त्याचे अभिनंदन.

माहेश्वरी अडकले होते वादात
गाझियाबादच्या लोणी सीमा पोलिसांनी मनीष माहेश्वरीला ट्विटरवर सांप्रदायिक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल नोटीस बजावली होती. सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडिओ एका वृद्ध मुस्लिमावर हल्ला केल्याचा होता. नोटीसमध्ये त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने ही नोटीस रद्द केली होती.

ट्विटरवर हिंदू देवीचा अपमान केल्याबद्दल अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने मनीष माहेश्वरी आणि ट्विटर हँडल एथिस्ट रिपब्लिकविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एथिस्ट रिपब्लिकने आपल्या ट्विटर हँडलवर काही टी-शर्टची छायाचित्रे पोस्ट केली होती. यातील एका टी-शर्टवर देवी कालीचे चित्र होते.

ट्विटर बनले विरोधकांचे लक्ष्य!
बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख उघड केल्याबद्दल ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खाते निलंबित केले. नंतर ते ब्लॉक करण्यात आले. यानंतर, काँग्रेसने आणखी 5 वरिष्ठ नेत्यांची ट्विटर खाती ब्लॉक केल्याचा दावा केला. तेव्हापासून ट्विटर हे विरोधकांचे लक्ष्य बनले आहे.

बातम्या आणखी आहेत...