आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटर इंडियाच्या MD विरूद्ध नवीन केस:भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल FIR दाखल; जम्मू-काश्मीर, लडाखला दाखवले होते वेगळा देश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर इंडियाचे MD मनीष माहेश्वरी यांच्याविरूद्ध उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ट्विटरच्या संकेतस्थळावर भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल बुलंदशहरमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. हा वाद वाढत असल्याचे पाहून ट्विटरने सोमवारी आपली चूक सुधारली. परंतु यापूर्वी दर्शवलेल्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांना भारतापासून वेगळे दाखवण्यात आले होते.

यूपीच्या बुलंदशहरमध्ये मनीष माहेश्वरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बजरंग दलाचे नेते प्रवीण भाटी यांच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. नवीन आयटी नियमांवरून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये ट्विटरवर दाखल केलेला हा दुसरी एफआयआर आहे.

यापूर्वी, गाझियाबाद पोलिसांनी 17 जून रोजी माहेश्वरी यांना नोटीस पाठवून 7 दिवसांच्या आत हजर राहायला सांगितले होते. हे प्रकरण मुस्लिम वृद्धाविरुद्ध अत्याचार आणि अश्लीलतेशी संबंधित होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माहेश्वरीसह 9 जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या सर्वांवर आरोप आहे की, त्यांनी या घटनेचा चुकीचा अर्थ लावला आणि त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या प्रकरणात माहेश्वरी यांना कर्नाटक हायकोर्टाकडून गेल्या आठवड्यात दिलासा मिळाला. कोर्टाने त्याच्या अटकेवर स्थगिती दिली आहे. असेही म्हटले आहे की बंगळुरूमध्ये राहणाऱ्या माहेश्वरीला यूपीला जाण्याची गरज नाही. यूपी पोलिसांना त्यांची चौकशी करायची असेल तर ते व्हर्च्युअली करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...