आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मुस्लिम वृद्धाला मारहाण प्रकरणी ट्विटरच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी ट्विटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष माहेश्वरीला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. ही नोटिस 17 जूनला पाठवण्यात आली आहे. तसेच, त्यांना सात दिवसांच्या आत लोनी बॉर्डर पोलिस स्टेशनमध्ये येऊन जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.
नोटिसमध्ये काय म्हटले ?
नोटिसमध्ये म्हटले की, ट्विटर कम्यूनिकेशन इंडिया आणि ट्विटर INC द्वारे काही लोकांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टींना थांबवण्याचा ट्विटरने काहीच प्रयत्न केला नाही. पोलिसांनी ट्विटरला आपली बाजु मांडण्यासाठी एका आठवड्याचा वेळ दिला आहे.
गाझियाबादमध्ये काय झाले ?
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी लोनी परिसरातील अब्दुल समद नावाच्या एका वृद्धाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरसह 9 जणांवर FIR दाखल केली. या घटनेला चुकीच्या पद्धतीने दाखवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हायरल व्हिडिओत एका वृद्धाला मारहाण करत त्याची दाडी कापल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, हे प्रकरण वेगळेच आहे. पीडित वृद्धाने आरोपींना काही तावीज(लॉकेट) दिले होते. पण त्याचा सकारात्कम परिणाम न झाल्यामुळे आरोपींनी वृद्धाला मारहाण केली. पण, ट्विटरने या व्हिडिओला मॅनिपुलेटेड मीडियाचा टॅग दिलाच नाही. पोलिसांनी पुढे सांगितले की, FIR मध्ये वृद्धाने जय श्री राम च्या घोषणा देणे आणि दाडी कापल्याचा उल्लेख केला नाही.
आरोपींमधील अय्यूब आणि नकवी पत्रकार आहेत, तर जुबैर फॅक्ट चेकिंग वेबसाइट ऑल्ट न्यूजचा लेखक आहे. डॉ. शमा मोहम्मद आणि निजामी काँग्रेस नेते आहेत. तर, अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता उस्मानीला काँग्रेसने मागच्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले होते.
ट्विटरचा काय संबंध ?
FIRमध्ये लिहीले की, गाझियाबाद पोलिसांकडून स्पष्टीकरण दिल्यानंतरही आरोपींनी आपले ट्विट्स डिलीट केले नाही. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाला. याशिवाय, ट्विटर इंडिया आणि ट्विटर कम्यूनिकेशन इंडिया प्राइवेट लिमिटेडनेही ते ट्विट डिलीट केले नाहीत. आता आरोपींविरोधात कलम 153, 153-A, 295-A, 505, 120-B, आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.