आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Twitter India's MD Manish Maheshwari Says Active Users Increased By 24% In Lockdown

सोशल मीडिया:ट्विटर इंडियाचे एमडी म्हणाले, लॉकडाऊनमध्ये अॅक्टिव्ह युजर्स 24% वाढले, ट्रोल आणि हेट स्पीचचे 50% ट्विट रिपोर्ट होण्यापूर्वीच ब्लॉक करतो

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: सुनील चौधरी
  • कॉपी लिंक
  • ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी व पब्लिक पॉलिसी संचालिका महिमा कौल यांच्याशी खास चर्चा

धर्मेंद्रसिंह भदौरिया 

लॉकडाऊनमुळे अनेकांचा ऑनस्क्रीन टाइम वाढला आहे. अनेक जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. देशात रेल्वे किंवा हवाई सेवा सुरू होण्यासारखी माहिती ट्विटरवरूनच देशाला मिळते. कोविड-१९ दरम्यान ट्विटमधील नवे फीचर, हेटस्पीच, ट्रोल इत्यादी प्रकरणावर दै. भास्करने ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि पब्लिक पॉलिसी इंडिया अँड साऊथ आशियाच्या संचालिका महिमा कौल यांच्याशी चर्चा केली.

हेट स्पीच रोखण्यासाठी आमचे धोरण सक्षम आहे

ट्विटरवर सार्वजनिक चर्चेसाठी सेवा देणे आमचे एकमेव ध्येय आहे. हेट स्पीच रोखण्यासाठी आमचे धोरण सक्षम आहे. लोकांनी रिपोर्ट करण्याआधीच सध्या ५० टक्के प्रकरणांत आम्ही कारवाई केलेली असते.

कोविड-१९ दरम्यान ट्विटरवरील चर्चेत तुम्हाला काही बदल जाणवला का?

आमच्या डेली अॅक्टिव्ह युजर्सची (एमडीएयू) संख्या २४ टक्क्यांनी वाढून १६.६ कोटी झाली आहे. सध्या मिळत असलेली पूरक स्थिती, उत्पादनातील सुधारणा आणि कोविड-१९ संबंधित जागतिक चर्चेमुळे ही वाढ झाली. आमच्या डेली अॅक्टिव्ह युजर्सच्या बाबतीत ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक वाढ आहे. या सेवेत मागील तिमाहीनंतर १.४ कोटी सरासरी डेली अॅक्टिव्ह युजर्स जोडले गेले आहेत.

कोविड-१९ बाबत दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्यांवर ट्विटरने काय कारवाई केली?

आम्ही नियमितपणे वैद्यकीय अधिकारी, संशोधक, एनजीओ आणि सरकारसोबत काम करत आहोत. अधिकृत स्रोतांना चुकीच्या पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कंटेंटवर देखरेख ठेवण्यासाठी आम्ही सुरक्षा नियमांचा आता अधिक विस्तार केला आहे. उदाहरणार्थ फिजिकल डिस्टन्सिंग प्रभावी नसते इत्यादी. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंटेंटवर आम्ही कारवाई करत आहोत. यात आक्षेपार्ह भाषेचा, काही शब्दांचाही समावेश आहे. डेव्हलपर्स आणि संशोधकांना कोविड-१९ विषयीच्या सार्वजनिक चर्चांवर अभ्यास करता यावा यासाठी ट्विटर, डेव्हलपर लॅब एक नवीन एंड पॉइंट तयार करत आहे.

गेल्या दोन महिन्यांत दिशाभूल करणारे किती पोस्ट्स व ट्विट काढण्यात आले?

१८ मार्चला आम्ही ग्लोबली अपडेट पॉलिसी जारी केली आहे. या अंतर्गत २४०० ट्विट्स हटवण्यात आले. आमच्या ऑटोमेटेड सिस्टिमने कोविड-१९ विषयी भ्रम निर्माण करणाऱ्या ३४ लाख खात्यांवर कारवाई केली.

ट्रोलिंगबाबत ट्विटरचे काय मत आहे?

आम्ही स्वतंत्र आणि सार्वजनिक सेवा देत आहोत. हेच आमचे खरे बलस्थान आहे. घृणास्पद वर्तन, हेराफेरी, गैरव्यवहार रोखण्याचे धोरण आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सवर कारवाई केली जाते. त्यांच्या माहितीचा स्रोत तपासून त्यांना ब्लॉक करण्यात येते. 

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ट्विटरने विश्वासार्ह माहिती देण्यासाठी नवीन फीचर जोडले आहे का?

ट्विटरने तीन नव्या सुरुवाती केल्या आहेत. कोविड-१९ शी संबंधित चुकीच्या माहिती पासून निपटण्यासाठी आम्ही निर्णायक उत्तर देत आहोत. आम्ही इंडिया-ओनली इव्हेंट्स पेजची सुरुवात करत आहोत. यात आयएफसीएम प्रमाणित केलेले लेटेस्ट फॅक्ट आणि कोविड-१९ विषयी विश्वासार्ह माहिती असेल.

याशिवाय आम्ही कोविड-१९ सर्च प्रॉम्प्टची सुरुवात केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि डब्ल्यूएचओद्वारे मिळालेली माहिती यामुळे उपलब्ध होईल. कोरोना व्हायरस ट्विट्स फ्रॉम इंडियन अॅथॉरीटीज या पेजच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचे मंत्री, अधिकारी किंवा विभाग तसेच आरोग्य संस्थांनी केलेले ट्विट्स टाइमलाइनवर एकत्रित बघता येतात. भारतातील प्रत्येक युजर हे पेज आपल्या टाइमलाइनवर सर्वात वर पाहू शकतो.

केंद्र-राज्य सरकारसोबत ट्विटर कशाप्रकारे काम करत आहे?

कोविड रिस्पॉन्स मॅनेजमेंटवर आम्ही विविध विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्य सरकार यांच्यासमवेत काम करत आहोत. कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड आणि उत्तर प्रदेश सरकारने स्वतंत्र कोविड-रिस्पॉन्स अकाउंट्स खाती सुरु करण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अॅट द रेट कोविड इंडिया सेवा हे स्वतंत्र खातेही सुरू केले आहे. शासनाच्या उपाययोजना, आरोग्य सेवांचा लाभ कसा घ्यावा किंवा कोरोना संशयितांची माहिती कशी मिळवावी, यासाठी ही सेवा जनतेला थेट अधिकाऱ्यांशी जोडते.

0