आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twitter Manipulated Media Tag Controversy; BJP Spokesperson Sambit Patra, Delhi Police​​​​​​​; News And Live Updates

ट्विटरने मागितली 3 महिन्यांची मुदत:ट्विटर म्हणाले - IT नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात येईल, आमच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेला धोका

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्विटरने या 4 मुद्द्यांवर दिली प्रतिक्रिया

टूलकिट वाद आणि सोशल मीडियाच्या नवीन मार्गदर्शक सुचनांविषयी ट्विटर आपले मौन सोडले आहे. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारकडून नवीन गाइडलाईन लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मागितला आहे. या नवीन आयटी नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अलीकडे, कंपनीच्या दिल्ली आणि गुडगाव येथील ट्विटर कार्यालयांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल देखील चिंतेत आहे. कंपनीने पुढे म्हटले की, अशा कारवाईमुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेस धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्विटरने या 4 मुद्द्यांवर दिली प्रतिक्रिया

1. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर
ट्विटरने दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे आमच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेस धोका आहे. आमच्या ग्राहकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलदेखील आम्ही काळजीत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. तथापि, ट्विटरने थेट दिल्ली पोलिसांचे नाव न घेता भारतासह जगाभरातील पोलिसांच्या धमकी देणारी प्रवृत्तीबद्दल चिंतेत असल्याचे सांगितले आहे.

2. सोशल मीडियाच्या नियमांवर
केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईनला लागू करणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. परंतु, ते पारदर्शकतेच्या तत्त्वांसह परिपूर्ण असायला हवे. त्यासोबतच संबंधित प्रकरणात भारत सरकारशी सतत चर्चा सुरु ठेवणार आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी ट्विटरने मागितला आहे.

3. भारतात अधिकारी नियुक्तीवर
केंद्र सरकारने या मार्गदर्शक सूचनांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात पदवीधर अधिकारी नेमण्यास सांगितले आहे. परंतु, यावर याबाबत आम्ही चिंतेत असून यामुळे प्लॅटफॉर्मवरील सामग्रीसाठी ग्रेवांस अधिकारी जबाबदार असतील. या नियमांमुळे ही पोहोच धोकादायक पातळीवर जाईल असे ट्विटरने सांगितले.

4. मार्गदर्शक सूचना कशी लागू करावी
आम्ही भारतीय जनतेसाठी वचनबद्ध असून आमची सेवा भारतातील संवादासाठी एक प्रभावी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनाकाळात आमची सेवा ही प्रमुख आधार स्त्रोत बनली आहे. ट्विटरने पुढे म्हटले की, भारत देशात आमची सेवा पूर्ववत सुरु ठेवण्याकरीता आम्ही हे आयटी नियम लागू करण्याचा प्रयत्न करु. त्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करताना, आम्ही पारदर्शकता, अभिव्यक्तीची मजबुती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या संरक्षणाची संपूर्ण काळजी घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...