आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्विटरने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, राहुल गांधी आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह इतर नेत्यांच्या हँडलवर 'ऑफिशियल' लेबल जोडले. मात्र, काही वेळातच हे फीचर्स काढून टाकण्यात आले.
आता ऑफिशियल फीचर्स कोणत्याही खात्याखाली दिसत नाही. दरम्यान, काही वेळातच ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी ट्विट केले की, येत्या काही महिन्यांत ट्विटर अनेक प्रयोग करीत आहेत. जे काम आम्ही करू त्यांच्याबद्दल कळवत राहूच.
समजून घ्या- ट्विटरने असे का केले
ब्लू टिक असलेले खाते आणि अधिकृत पडताळणी केलेले खाते यामध्ये फरक करण्यासाठी कंपनीने हे फीचर्स आणले आहे. ट्विटरचे अधिकारी एस्थर क्रॉफर्ड यांनी ट्विट केले आहे की, "बऱ्याच लोकांनी विचारले आहे की ते ब्लू टिक केलेले आणि अधिकृतपणे सत्यापित खाते यांच्यात फरक कसा करतात. यामुळेच काही खात्यांवर ऑफिशियल लेबल जोडण्यात आले आहे. तसेच यापूर्वी असलेल्या व्हेरिफाय झालेल्या खात्यांना अधिकृत लेबल मिळणार नाही.
क्रॉफर्ड म्हणाले की, ज्या खात्यांना ऑफिशिअल फीचर्स दिले जात आहे. त्यात सरकारी खाती, व्यावसायिक भागीदार, व्यावसायिक कंपन्या, मीडिया आउटलेट्स आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. हे अधिकृत लेबल खरेदी केले जाऊ शकत नाही. क्रॉफर्डने निदर्शनास आणून दिले की नवीन ट्विटर ब्लूमध्ये आयडी सत्यापन समाविष्ट नाही. ही सशुल्क सदस्यता आहे.
मोदींशिवाय या नेत्यांच्या ट्विटर हँडलवर ऑफिशिअल लेबलही दिसले
अधिकृत लेबल अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतर काही मंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर देखील दिसले. सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूलाही ट्विटरचे लेबल देण्यात आले.
ब्लू टिकसाठी 660 रुपये
ब्लू टिक म्हणजेच ट्विटरवर सत्यापित खात्यांसाठी, वापरकर्त्याला दरमहा $ 8 (सुमारे 660 रुपये) द्यावे लागतील. हे शुल्क देशानुसार वेगवेगळे असेल. इलॉन मस्क यांनी 27 ऑक्टोबर रोजी ट्विटर विकत घेतल्यानंतर पाच दिवसांनी मंगळवारी रात्री याची घोषणा केली. दुसरीकडे, ब्लू टिक्ससाठी जगभरातून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, एलोन मस्क यांनी स्पष्ट केले की सर्व तक्रारकर्त्यांनो, कृपया तक्रार करत रहा, परंतु तुम्हाला $8 भरावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.