आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twitter Vs Modi Government Latest News Update; Resident Grievance Officer, Vinay Prakash, Resident Grievance Officer For India, Twitter, Narendra Modi; News And Live Updates

ट्विटरची नरमाई:ट्विटरने रहिवाशी तक्रार अधिकाऱ्याची केली नियुक्ती; नवीन IT मंत्र्यांच्या इशार्‍यानंतर ट्विटरने 3 दिवसांत केले कायद्याचे पालन

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली उच्च न्यायालयानेदेखील बजावले होते

नवीन आयटी कायद्यावरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. परंतु, शेवटी ट्विटरने हा कायद्याचे पालन केले असून भारतात रहिवाशी तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्याचे नाव विनय प्रकाश असल्याचे ट्विटने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितले आहे.

केंद्र सरकारने 25 फेब्रुवारीला नवीन आयटी कायदा जारी केला होता. त्यानुसार, संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना 3 महिन्यांचा आत लागू करण्याचे आदेश दिले होते. परंतु, ट्विटरने डेडलाईन संपल्याच्या 46 दिवसानंतर कायद्याचे पालन केले आहे.

नवीन आयटी मंत्र्यांने दिला होता इशारा
भारताचे नवीन आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 8 जुलै रोजी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्विकारला. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ट्विटरला कायद्याचे पालन करण्यासंदर्भांत इशारा दिला होता. विशेष म्हणजे वैष्णव यांनी इशारा दिल्याच्या तीन दिवसानंतर ट्विटरने या कायद्याचे पालन केले आहे. देशातील कायदा सर्वात वर असून ट्विटरने याला लागू करावे असे म्हटले होते.

दिल्ली उच्च न्यायालयानेदेखील बजावले होते
नियमांचे पालन न केल्यास सरकारने कारवाई केली तर कोणतेही कायदेशीर संरक्षण मिळणार नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला बजावले आहे. नव्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांचे कंपनीने पालन न केल्यासंदर्भातील प्रकरणात गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्या. रेखा पल्ली यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुनावणीच्या वेळी कंपनीच्या वतीने शपथपत्र सादर करण्यात आले होते.

ट्विटरवर आतापर्यंत 5 तक्रार दाखल
1. मुस्लिम वृद्धाला मारहाण प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर एफआयआर नोंदविला होता.
2. देशाचा चुकीचा नकाशा दाखविल्याप्रकरणी बुलंद शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
3. मध्य प्रदेशच्या सायबर सेलमध्ये देशाचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
4. चाईल्ड पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता.
5. हिंदू देवीचा अपमान केल्याबद्दल द‍िल्ली पोल‍िसांत तक्रार दाखल

रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल केले होते ब्लॉक
ट्विटरने यापूर्वी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल एक तासासाठी ब्लॉक केले होते. त्यांनी अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे यामागे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना इशारा देत त्यांचे ट्विटर हँडल पुन्हा सुरू केले.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रविशंकर प्रसाद म्हणाले होते की, 'मित्रांनो! आज एक अतिशय विचित्र घटना घडली. ट्विटरने माझे खाते एक तासासाठी ब्लॉक केले. प्रसाद यांनी ही माहिती आधी नेटिव्ह मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट कु आणि त्यानंतर ट्विटरद्वारे शेअर केली होती.

बातम्या आणखी आहेत...