आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Twitter Vs Narendra Modi Government | Twitter Removes Verified Blue Tick, Twitter, Verified Blue Tick, Mohan Bhagwat

ट्विटरच्या पॉलिसीवर प्रश्न:इनॲक्टिव्ह असल्याचे कारण देत भागवतांसह संघाच्या अनेक नेत्यांचे हँडल अनव्हेरिफाय, मग प्रणब मुखर्जी आणि अहमद पटेलांसारख्या दिवंगत नेत्यांचे अकाउंट अजूनही व्हेरिफाय का ?

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेकांचे अकाउंट्स मेमोरियल अकाउंट्स म्हणूनही वापरात नाहीत

नवीन IT नियमांवरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये सुरू असलेला वाद तेव्हा वाढला, जेव्हा ट्विटरने उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक नेत्यांच्या पर्सनल ट्विटर हँडलवरुन ब्लू टिक काढून टाकला. परंतु, काही वेळानंतर आधी उपराष्ट्रपती, नंतर मोहन भागवत आणि संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांच्या अकाउंटचे ब्लू टिक परत आले.

यावर ट्विटरने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे अकाउंट अनेक दिवसांपासून अॅक्टिव्ह नव्हते, म्हणून ब्लू टिक हटवण्यात आले. यामुळेच वाद सुरू झाला, कारण दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, काँग्रेते अहमद पटेल, अभिनेता इरफान खानसह अनेक जणांचे ट्विटर अकाउंट अजूनही व्हेरिफाय आहेत.

हे अकाउंट अनेक दिवसांपासून इनअॅक्टिव्ह
प्रणब मुखर्जी यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अखेरचे ट्वीट त्यांच्या मृत्यूपूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये केलो होते. तर, अहमद पटेल यांचे अकाउंट ऑक्टोबर 2020 आणि इरफानचे अकाउंट मे 2020 पासून अॅक्टिव्ह नाही. त्यांचे अकाउंट्स मेमोरियल अकाउंट्स म्हणूनही वापरात नाहीत.

ट्विटरचे ब्लू टिक व्हेरिफिकेशन काय आहे ?
ट्विटरनुसार, ब्लू व्हेरिफाइड बॅज (ब्लू टिक) चा अर्थ हे अकाउंट त्या संबधित व्यक्ती किंवा संस्थेचे आहे. हे ब्लू टिक मिळवण्यासाठी ट्विटरवर सक्रिय असणे महत्वाचे आहे. सध्या ट्विटर सरकारी कंपन्या, ब्रांड आणि नॉन-प्रॉफिट ऑर्गेनायजेशन, न्यू एजंसी आणि पत्रकार, मनोरंजन, स्पोर्ट्स, कार्यकर्ता, ऑर्गेनायजर्स आणि इतर मोठ्या व्यक्तींच्या अकाउंटला व्हेरिफाय करते.

बातम्या आणखी आहेत...