आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:काँग्रेसचे काही लाेक यूपीए-2 शी लढताहेत : तिवारी सातव म्हणाले, हमें तो देखना है, तू जालिम कहां तक है..

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साेनियांच्या बैठकीत नाराजी दर्शवणाऱ्या वक्तव्यावरून ट्विटर वॉर

काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणानंतर आता महाराष्ट्रातूनही संघर्षाचे वारे वाहू लागल्याने काँग्रेस नेते त्रस्त झाल्याचे दिसते. काँग्रेस अध्यक्ष साेनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्यांची बैठक बाेलावली हाेती. यूपीए-२ सरकारमधील मंत्री राहिलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांमुळे काँग्रेसची आजची स्थिती झाली आहे. पक्ष वाईट स्थितीत पाेहाेचला आहे, असे बैठकीत राजीव सातव यांनी म्हटले हाेते. त्यावर आता यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या मनीष तिवारी यांनी ट्विट करून सातव यांच्यावर निशाणा साधला. तिवारी म्हणाले, भाजप २००४ ते २०१४ या दरम्यान सत्तेतून बाहेर हाेता. तेव्हा भाजपच्या लाेकांनी कधीही वाजपेयी किंवा त्यांच्या सरकारला पक्षाच्या स्थितीबद्दल दाेष दिला नाही. दुर्दैवाने काँग्रेसचे काही आजारी लाेक एनडीए किंवा भाजपऐवजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-२ सरकारशी लढू लागले आहेत. आता सोबत राहून चालण्याची गरज आहे. परंतु विभाजनासारखे विचार घेऊन वाटचाल केली जात आहे, असा टोला तिवारी यांनी लगावला. त्यावर सातव यांनी शायराना शैलीत ट्विट केले. त्यात सातव म्हणाले, ‘मत पूछ मेरे सब्र की इन्तेहा कहां तक है। तू सितम कर ले, तेरी ताकत जहां तक है। वफा की उम्मीद जिन्हे होगी, उन्हे होगी। हमें तो देखना है, तू जालिम कहां तक है। ’

राहुल गांधी यांचे विश्वासू :

राज्यसभा सदस्य राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममधील विश्वासू मानले जातात. सातव यांच्या आई रजनी सातवदेखील मंत्री राहिल्या. सातव यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन जागी विजय मिळाला होता. त्यापैकी राजीव सातव यांची (हिंगोली) एक जागा होती. मोदी लाट असतानाही ते सुमारे दोन हजार मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत मात्र सातव यांचा पराभव झाला होता.

बातम्या आणखी आहेत...