आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगारांसाठी कामगार विशेष ट्रेन चालवण्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात 2 दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. गोयल यांनी मंगळवारी ठाकरे सरकारवर व्यवस्था न केल्याचा आरोप केला आहे. रेल्वेमंत्री म्हणाले की, "रेल्वे कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रात्र परिश्रम घेतले. आम्ही महाराष्ट्राला 145 रेल्वे गाड्या दिल्या. प्रत्येक रेल्वेगाडीविषयी राज्य सरकारला माहिती दिली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 गाड्या रवाना होणार होत्या. मात्र दुपारी 12.30 पर्यंत कोणीच प्रवासी बसला नाही. सरकार या 74 पैकी केवळ 24 गाड्यांसाठी प्रवाशी पाठवू शकले. महाराष्ट्रात अजूनही 50 रेल्वे गाड्या उभ्या आहेत."
रेल्वे मंत्र्यानुसार, यांपैकी फक्त 13 गाड्या मजुरांना घेऊन त्यांच्या राज्यांपर्यंत पोहचल्या. त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले की, "“मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की संकटग्रस्त स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहचण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. प्रवाशांना वेळेवर स्टेशनवर आणणे आवश्यक आहे, याचा परिणाम संपूर्ण नेटवर्क आणि योजनेवर होईल."
रेल्वेमंत्र्यांचे नवीन ट्विट
On request of Maharashtra Govt, we arranged 145 Shramik Special Trains today. These trains are ready since morning. 50 trains were to leave till 3 pm but only 13 trains have due to lack of passengers.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 26, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.