आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Arrested Including Pharma Company Director, Two Officers Involved In Excise Duty Policy

अबकारी धोरण:फार्मा कंपनी संचालकासह दाेन जणांना अटक,  दोन अधिकाऱ्यांंचा उत्पादन शुल्क धोरणात सहभाग

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या रद्द केलेल्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दोन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यात मद्य कंपनी परनोड रेकॉर्डचे महाव्यवस्थापक बिनोय बाबू आणि अरबिंदो फार्माचे संचालक व प्रमोटर पी. शरतचंद्र रेड्डी यांचा समावेश आहे.

ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले, दोघेही चौकशीत सहकार्य करत नव्हते. सविस्तर माहिती मिळवल्यानंतरच याबाबत अधिक खुलासा करू, असे अरबिंदो फार्माने शेअर बाजाराला सांगितले. सूत्रांनुसार, दोघा अधिकाऱ्यांंचा दिल्लीचे उत्पादन शुल्क धोरण बनवण्यात कथितरीत्या सहभाग होता आणि संपूर्ण नेटवर्क ‘ऑर्गनाइज’ करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ईडीने टाकलेल्या आधीच्या छाप्यात एका कर्मचाऱ्याच्या ठिकाणाहून उत्पादन शुल्क धोरणाचा मसूदा जप्त केला होता. एका फर्मने नियमांविरुद्ध किरकोळ मद्य व्यापारात २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे चौकशीत आढळले. ईडीने याप्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. सप्टेंबरमध्ये मद्य निर्मिती कंपनी इंडोस्पिरिटचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांना अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...