आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तामिळनाडूत दोन भावांनी वडिलांच्या चित्रपटांत काम करण्यासाठी केलेल्या उलाढाली पाहून आश्चर्याचा धक्का बसेल. वडिलांना चित्रपटाची निर्मिती करायची होती. चित्रपटात प्रमुख भूमिका हे दोघे साकारणार होते. त्यासाठी त्यांच्याकडील पैसे संपले. त्यामुळे त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून बकऱ्या चोरण्याचा उद्योग सुरू केला. त्यांच्याकडे चित्रपट निर्मिती करण्याइतपत पैसा साचला होता. पण तीन वर्षांनंतर त्यांची चोरी पकडली गेली.
यासंदर्भात माहिती अशी की, निरंजनकुमार(३०) व लेनिनकुमार (३२) तामिळनाडूच्या वॉशरमनपेट भागात गेल्या तीन वर्षांपासून बकऱ्या चोरत होते. दोघा भावांनी शेवटची चोरी गेल्याच आठवड्यात केली होती. दोघा भावांना माधवरम पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. दोघे भाऊ दररोज ८ ते १० बकऱ्या चोरून विकत होते. त्यांच्याकडे दररोज ८ हजार रुपये जमा होत गेले. ही रक्कम त्यांना पैसे चित्रपटाच्या निर्मितीसाठी हवे होते. दरम्यान माधवरम येथील पलानी यांच्याकडील ६ बकऱ्यांपैकी एक बकरी चोरीस गेली, तेव्हा त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघा भावांचे चेहरे दिसले. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी साध्या वेशात दोघांवर पाळत ठेवली.आणि एके दिवशी रंगेहात पकडले. त्यांनी याआधीही बकऱ्या चोरल्याची कबुली दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.