आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Two Corona Passengers Traveling In Different Planes, Other Passenger Quarantine With Crew

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्क्रीनिंगमध्ये संसर्ग:वेगवेगळ्या विमानांत प्रवास करणारे दोघे कोरोनाबाधित, क्रूंसह इतर प्रवासी क्वाॅरंटाइन

कोईम्बतूर/लुधियानाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परदेशातून आलेल्यांना 7 दिवस क्वाॅरंटाइन आवश्यक, हॉटेल्सनी 14 दिवसांचे पैसे घेऊ नयेत : केंद्र सरकार

देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी प्रवास करणारे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यातील एक युवक इंडिगो विमानाने चेन्नईहून कोईम्बतूरला गेला होता. तर, एअर इंडियाचा सुरक्षा कर्मचारी दिल्लीहून लुधियानाला गेला होता. या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन्ही उड्डाणांतील क्रू आणि इतर प्रवाशांना माहिती देण्यात आले. सर्वांना १४ दिवस होम क्वाॅरंटाइन राहावे लागणार आहे. इंडिगोनुसार, कोईम्बतूरला पोहोचलेल्या युवकाने इतर प्रवाशांप्रमाणे मास्क, फेस शील्ड आणि हातमोजे घातले होते. शेजारी कुणीच नव्हते. त्यामुळे धोका कमी आहे. सोमवारी चेन्नईहून दिल्लीस १३० प्रवासी पोहोचले. या सर्वांची तपासणी झाली. लुधियानात ११६ जणांची तपासणी झाली. यात एक पॉझिटिव्ह आढळला. या दोघांमध्येही कोणतीच लक्षणे नसल्याने स्क्रीनिंगमध्ये संसर्ग झाल्याचे लक्षात आले नाही.

दुसऱ्या दिवशीही उड्डाणे रद्द झाल्याची सूचनाच नाही

मर्यादित संख्येत देशांतर्गत प्रवासी विमान उड्डाणे सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारीही काही विमाने अचानक रद्द करण्यात आल्याची कोणतीही सूचना बुकिंग केलेल्या प्रवाशांना मिळाली नाही. त्यामुळे या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

भास्कर प्रश्न

सर्व ठिकाणी डिस्टन्सिंग तर रेल्वे, विमानात जवळ जवळ का बसवता?

कोरोनापासून बचावाचा एकच पर्याय म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग. विमानतळावर प्रवेशापासून विमानापर्यंत हे अत्यावश्यक आहे. मग, मधले सीट रिक्त का ठेवले जात नाही? रेल्वेतही प्रवाशांना अगदी जवळजवळ का बसवले जात आहे? अन्यथा फिजिकल डिस्टन्सिंग ही केवळ औपचारिकताच राहील.

परदेशातून आलेल्यांना 7 दिवस क्वाॅरंटाइन आवश्यक, हॉटेल्सनी 14 दिवसांचे पैसे घेऊ नयेत : केंद्र सरकार

परदेशातून येणाऱ्या भारतीयांना ७ दिवस क्वाॅरंटाइन राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, हॉटेलचालकांनी १४ दिवसांच्या क्वाॅरंटाइनचे पैसे घेतले होते. याची दखल घेऊन गृह मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना संबंधित लोकांना सात दिवसांचे पैसे परत करण्यात यावेत, अशा सूचना दिल्या. हॉटेल्स या लोकांना १४ दिवस क्वाॅरंटाइन करत असल्याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने हे पाऊल उचलले.

बातम्या आणखी आहेत...