आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोविड-१९ साथरोगामुळे अर्थव्यवस्थेपासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रावर परिणाम जाणवतो आहे. मुलींच्या शिक्षणावर झालेल्या एका पाहणीत उच्च माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या २ कोटी मुलींना शाळेत जाणे अवघड झाले आहे.
शिक्षणाचा हक्कासाठी काम करणाऱ्या एका संस्थेने सेंटर फॉर बजेट अँड पॉलिसी स्टडीज व चॅम्पियन्स फॉर गर्ल्स एज्युकेशनच्या साह्याने देशातील ५ राज्यांत पाहणी केली. याचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. ‘मॅपिंग द इम्पॅक्ट ऑफ कोविड-१९’ नावाने झालेले संशोधन २६ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले. यात युनिसेफचे एज्युकेशन प्रमुख टेरी डर्नियन व बिहार स्टेट कमीशन फाॅर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अध्यक्षा प्रमिलाकुमारी प्रजापती यांनी चिंता व्यक्त केली आहे. जूनमध्ये ३१७६ कुटुंबांच्या झालेल्या पाहणीत उत्तर प्रदेशातील ११ , बिहारचे ८ व अासामच्या ५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर तेलंगणातील ४ व दिल्लीच्या एका जिल्ह्याचा यात समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या मागास समाजाच्या कुटुंबातील ७०% लोकांनी आमच्याकडे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. राशन मिळत नाही. मग मुलींना शिकवण्यास पाठवणार कसे? असे बोलून दाखवले आहे. या अभ्यासात डिजिटल माध्यमांतून मुलींना शिक्षणाचा लाभ मिळालेला नाही. कारण मोबाइल व इंटरनेट सुविधा जर घरातील एकाच व्यक्तीकडे असेल तर घरात मुले व मुलीही शाळेत जाणाऱ्या असतात. मग मुलांनाच प्राधान्य मिळते. त्यामुळे मुलींचे हे सत्र वाया जाणार आहे.
ई-लर्निंगचा फायदा नाही, घरात काम दिले जाते
डिजिटल प्लेटफॉर्म व टीव्हीवर शिक्षणासंबंधीचे काही कार्यक्रम सुरू केले आहेत. परंतु बहुतांश मुलांना याचा लाभ घेता येत नाही. अभ्यासाच्या पाहणीत सुमारे ५२% घरात टीव्ही सेट होता. यानंतरही फक्त ११% मुलांनी शिक्षणासंबंधीचे कार्यक्रम पाहिले. ई-लर्निंगदरम्यान मुली मागे पडण्यामागे आणखी एक कारण असे की, त्यांना घरातील कामात जुंपले जाते. सुमारे ७१% मुलींना कोरोनामुळे घरात थांबावे लागले. अभ्यासाच्या वेळेतही त्यांना घरात काम करावे लागले. तर मुलींच्या तुलनेत फक्त ३८ टक्के मुलांना घरात काम करण्याबाबत सांगितले जाते, असे या वेळी दिसून आले.
शिक्षण थांबल्याने त्यांच्या लग्नासाठी घाई होईल
कोविडमुळे मुलींचे शिक्षण बंद केले अाहे. त्याबरोबरच लग्नासाठी घाई होण्याचीही भीती आहे. याचा परिणाम आफ्रिकेत इबोला साथरोगाच्या काळात पाहण्यास मिळाला. मुलींची लग्ने लवकर झाली आणि शाळा सुटली. म्हणजे कोरोनानंतरही मुलीच्या शिक्षणांवर खास करून लक्ष देण्याची गरज अाहे.
ज्या मुलींना संसर्ग नाही त्यांना अॅनिमियाचा धोका
अभ्यासात म्हटले आहे की, मुलींना संसर्ग झालेला नसला तरी त्यांना धोके आहेत. शाळा बंद झाल्याने मुलींना आयर्न-फॉलिक अॅसिड नियमित न मिळाल्याने अॅनिमिया अथवा रक्ताची कमतरता होण्याचा धोका होण्याची शक्यता आहे. ते पाहता अनेक राज्यांत आयएफएच्या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.