आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Two Girls From POK Lost Their Way In Poonch, Captured By The Army, Preparing To Be Sent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:पीओकेतील दोन मुली रस्ता विसरल्याने पुंछमध्ये, लष्कराने घेतले ताब्यात, पाठवण्याची तयारी

पुंछएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरातून (पीओके) १७ आणि १३ वर्षांच्या दोन मुली रस्ता विसरल्याने भारतीय सीमेत आल्या. सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांनी त्यांना पाहिले आणि त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. लष्कराचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, पुंछ जिल्ह्यातील खारी सेक्टरमध्ये सरला पोस्ट जवळ रविवारी सकाळी भारतीय सीमेत प्रवेश करणाऱ्या दोन मुलींना पकडले. त्या पीओकेतील फॉरवर्ड कहुता तालुक्यातील अब्बासपूर गावातील लाईबा जबैर (१७) आणि सना जबैर (१३) असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही मुली नजरचुकीने भारतीय सीमेत आल्या. लष्कराने दोघींना कोणताही त्रास दिला नाही.

पाक : लग्नास नकार, ख्रिश्चन मुलीची हत्या
इस्लामाबाद| पाकिस्तानातील रावळपिंडीत मुस्लिम व्यक्तीसोबत लग्नास नकार दिल्याने ख्रिश्चन मुलीची हत्या करण्यात आली. मुख्य संशयित शहजाद फरार आहे. शहजादने ख्रिश्चन मुलगी सोनियाला लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तिच्या आई- वडिलांनी त्याला नकार दिला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser