आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरपणे हत्या:महिलेसह दोन भारतीयांचा गोळ्या झाडून म्यानमार लष्कराकडून खून

इंफालएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

म्यानमार लष्कराच्या जवानांनी मणिपूरच्या सीमेत दोन भारतीयांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. मणिपूर सीमाभागातील तमू (टाय म्यू) गावात मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, ते दोघे दूध वितरणासाठी निघाले होते, त्याचवेळी म्यानमारच्या सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. जुंटा सेनेविरुद्ध सुरू असलेल्या निदर्शनांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. तमू म्यानमारच्या हद्दीत आहे. दोन पूल पार केल्यानंतर मणिपूरच्या मोरेह येथून तमूला पोहोचता येते. गेल्या काही महिन्यांत या भागात ८३ पेक्षा अधिक नागरिकांची हत्या झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...